MPSC PYQ Hub प्रश्नपत्रिका • उत्तरतालिका • अभ्यास साहित्य
विश्वसनीय अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी

Talathi Bharti 2026 Syllabus | तलाठी अभ्यासक्रम PDF | MPSC Group C Prelims

TALATHI BHARTI 2026

Talathi Bharti 2026 Syllabus

तलाठी अभ्यासक्रम | MPSC Group C Prelims | Syllabus PDF

Talathi Bharti 2026 Syllabus शोधणाऱ्या उमेदवारांसाठी या पोस्टमध्ये ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क पदासाठी लागू असलेल्या MPSC Group C संयुक्त पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम, विषयवार महत्त्वाचे Topics आणि Syllabus PDF दिले आहे.

2026 मध्ये तलाठी पदाचा समावेश महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अंतर्गत करण्यात आला आहे. त्यामुळे तलाठीची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी Group C च्या संयुक्त पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार तयारी करणे महत्त्वाचे आहे.

📢 Talathi Bharti 2026 महत्त्वाचा अपडेट

2026 च्या Group C भरतीमध्ये ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क या पदाचा समावेश करण्यात आला आहे. उपलब्ध 2026 माहितीनुसार 1,539 तलाठी पदे संयुक्त Group C भरतीमध्ये समाविष्ट आहेत.

📝 Talathi Bharti 2026 Prelims Exam Pattern

तलाठी पदाचा समावेश MPSC Group C संयुक्त पूर्व परीक्षेत असल्यामुळे तलाठी उमेदवारांसाठी Group C Prelims च्या सुधारित परीक्षेच्या स्वरूपाची माहिती महत्त्वाची आहे.

100
प्रश्न
100
गुण
1 तास
कालावधी
MCQ
प्रश्नप्रकार
घटक तपशील
परीक्षा MPSC Group C संयुक्त पूर्व परीक्षा
प्रश्नसंख्या 100
एकूण गुण 100
कालावधी 1 तास
प्रश्नप्रकार Objective / बहुपर्यायी
दर्जा पदवी
माध्यम मराठी व इंग्रजी

📚 Talathi Bharti 2026 Syllabus

तलाठी पदासाठी Group C संयुक्त पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये खालील प्रमुख विषयांचा समावेश आहे.

1. इतिहास

10 प्रश्न

📖 महत्त्वाचे Topics

  • भारताचा आधुनिक इतिहास
  • भारतीय स्वातंत्र्य चळवळ
  • 1857 चा उठाव
  • भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
  • ब्रिटिश काळातील महत्त्वाचे कायदे
  • सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी
  • महाराष्ट्राचा इतिहास
  • महाराष्ट्रातील समाजसुधारक
  • संयुक्त महाराष्ट्र चळवळ
  • मराठवाडा मुक्तिसंग्राम

2. भूगोल

10 प्रश्न

🌍 महत्त्वाचे Topics

  • महाराष्ट्राचा स्थान व विस्तार
  • महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल
  • नदीप्रणाली
  • हवामान
  • मृदा व जलसिंचन
  • लोकसंख्या
  • कृषी
  • खनिज संपत्ती
  • उद्योगधंदे
  • वाहतूक व पर्यटन
  • भारताचा भूगोल

3. अर्थशास्त्र

15 प्रश्न

💰 महत्त्वाचे Topics

  • राष्ट्रीय उत्पन्न
  • सार्वजनिक वित्त
  • भारतीय करसंरचना
  • दारिद्र्य व बेरोजगारी
  • बँकिंग
  • शासकीय योजना
  • आर्थिक नियोजन
  • पंचवार्षिक योजना
  • भारतातील आर्थिक सुधारणा
  • व्यापारतोल व व्यवहारतोल
  • भारताचा परकीय व्यापार
  • लोकसंख्या
  • कृषी, उद्योग व सेवा

4. पॉलिटी / राज्यशास्त्र

15 प्रश्न

⚖️ महत्त्वाचे Topics

  • भारतीय राज्यघटना
  • घटना निर्मिती
  • मूलभूत हक्क
  • राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वे
  • मूलभूत कर्तव्ये
  • महत्त्वाची घटनात्मक कलमे
  • राष्ट्रपती व उपराष्ट्रपती
  • पंतप्रधान व मंत्रिमंडळ
  • राज्यपाल
  • मुख्यमंत्री व राज्य मंत्रिमंडळ
  • संसद व विधानमंडळ
  • सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय
  • घटनात्मक व बिगरघटनात्मक आयोग
  • केंद्र-राज्य संबंध
  • पंचायतराज व ग्रामप्रशासन

5. चालू घडामोडी

15 प्रश्न

📰 महत्त्वाचे Topics

  • महाराष्ट्रातील चालू घडामोडी
  • राष्ट्रीय घडामोडी
  • आंतरराष्ट्रीय घडामोडी
  • शासकीय योजना व धोरणे
  • शासकीय पोर्टल्स
  • महत्त्वाच्या नियुक्त्या
  • पुरस्कार व पुस्तके
  • क्रीडा
  • आर्थिक व सामाजिक घडामोडी
  • पर्यावरण
  • संरक्षण व अंतरिक्ष
  • विज्ञान व तंत्रज्ञान

6. सामान्य विज्ञान

15 प्रश्न

🔬 महत्त्वाचे Topics

जीवशास्त्र
  • पचनसंस्था
  • रक्ताभिसरण संस्था
  • प्रजनन संस्था
  • मानवातील ग्रंथी व संप्रेरके
  • रोग
  • वनस्पतींचे वर्गीकरण
  • प्राण्यांचे वर्गीकरण
  • वनस्पतीशास्त्र
रसायनशास्त्र
  • द्रव्य व त्याचे स्वरूप
  • अणूची संरचना
  • मूलद्रव्यांचे वर्गीकरण
  • खनिजे व धातुके
  • कार्बनचे जग
  • आम्ल व आम्लारी
  • रासायनिक अभिक्रिया
भौतिकशास्त्र
  • गती, बल व चाल
  • गुरुत्वाकर्षण
  • कार्य, ऊर्जा व शक्ती
  • ध्वनी
  • प्रकाश
  • विद्युतधारा

7. गणित व बुद्धिमत्ता

20 प्रश्न

🧠➗ महत्त्वाचे Topics

गणित
  • संख्या व संख्यापद्धती
  • टक्केवारी
  • नफा व तोटा
  • सरासरी
  • गुणोत्तर व प्रमाण
  • साधे व चक्रवाढ व्याज
  • वेळ व काम
  • वेग, वेळ व अंतर
  • वयावरील उदाहरणे
  • क्षेत्रफळ व घनफळ
  • समीकरणे
  • डेटा इंटरप्रिटेशन
बुद्धिमत्ता / Reasoning
  • सांकेतिक भाषा
  • सांकेतिक तुलना
  • संख्या व अक्षर मालिका
  • आकृतीवर आधारित तर्कक्षमता
  • दिशाज्ञान
  • बैठक व्यवस्था
  • नातेसंबंध
  • रांगेतील क्रमांक
  • खरे-खोटे
  • कालमापन
  • घड्याळ

🔥 2025 च्या पेपरमधील प्रश्नांचा Pattern

तलाठी पदाचा समावेश Group C संयुक्त पूर्व परीक्षेत झाल्यामुळे Group C Prelims च्या मागील वर्षाच्या paper trend चा reference तलाठी उमेदवारांना अभ्यासाचे नियोजन करताना उपयोगी ठरू शकतो.

विषय 2025 मध्ये प्रश्न
इतिहास 10
भूगोल 10
अर्थशास्त्र 15
पॉलिटी 15
चालू घडामोडी 15
विज्ञान 15
गणित + बुद्धिमत्ता 20
एकूण 100 प्रश्न

📥 Talathi Bharti 2026 Syllabus PDF

MPSC Group C संयुक्त पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम PDF येथे डाउनलोड करा.

📄 Talathi / Group C Prelims Syllabus PDF Download

🖼️ Talathi Bharti 2026 Syllabus

अधिकृत अभ्यासक्रमाची image खाली दिली आहे. पूर्ण resolution मध्ये पाहण्यासाठी image वर क्लिक करा.

🎯 Talathi Bharti 2026 तयारीची योग्य दिशा

  • सर्वप्रथम Group C संयुक्त पूर्व परीक्षेचा अधिकृत syllabus समजून घ्या.
  • इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, पॉलिटी, चालू घडामोडी आणि विज्ञान या विषयांची नियमित revision करा.
  • गणित व बुद्धिमत्तेसाठी दररोज प्रश्नांचा सराव करा.
  • महाराष्ट्राशी संबंधित घटकांकडे विशेष लक्ष द्या.
  • मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका आणि PYQ चा नियमित सराव करा.
  • एका वर्षाच्या question pattern ला fixed मानू नका.
महत्त्वाची सूचना:
Talathi पदाचा समावेश MPSC Group C संयुक्त पूर्व परीक्षेत करण्यात आला आहे. वरील विषयवार प्रश्नवाटप हे 2025 च्या मागील वर्षाच्या paper pattern चा reference आहे. पुढील परीक्षेत प्रश्नांचे विषयवार वितरण बदलू शकते. अंतिम तयारीसाठी अधिकृत MPSC syllabus, परीक्षा योजना, जाहिरात आणि शुद्धिपत्रक यांना प्राधान्य द्या.