MPSC PYQ Hub प्रश्नपत्रिका • उत्तरतालिका • अभ्यास साहित्य
विश्वसनीय अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी

MPSC Group B Prelims Syllabus 2026: Subject-wise Topics & PYQ Analysis

MPSC GROUP B PRELIMS 2026

Subject-wise Syllabus & 2025 PYQ Analysis

2025 च्या पेपरमधील प्रश्नवाटप आणि विषयवार महत्त्वाचे अभ्यास घटक

📌 MPSC Group B Prelims: Subject-wise तयारी

MPSC Group B Combined Preliminary Examination ची तयारी करताना syllabus सोबत मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचे analysis केल्यास कोणत्या विषयातून किती प्रश्न आले आणि कोणत्या घटकांना अधिक प्राधान्य द्यायचे याची दिशा मिळते.

महत्त्वाचे: खालील 10-10-15-15-15-15-20 प्रश्नवाटप हे 2025 च्या Group B Preliminary Examination मधील subject-wise analysis आहे. हे दरवर्षीचे निश्चित official weightage समजू नये.

🔥 2025 Previous Year Paper: Subject-wise Analysis

2025 च्या पेपरमध्ये दिसलेले प्रश्नवाटप
विषय प्रश्न Weightage
इतिहास1010%
भूगोल1010%
अर्थशास्त्र1515%
पॉलिटी1515%
चालू घडामोडी1515%
विज्ञान1515%
गणित + बुद्धिमत्ता2020%
एकूण100100%
मुख्य निरीक्षण: 2025 मध्ये गणित + बुद्धिमत्ता विभागातून 20 प्रश्न आले. अर्थशास्त्र, पॉलिटी, चालू घडामोडी आणि विज्ञान या प्रत्येक विषयातून 15-15 प्रश्न आले.

📚 विषयवार महत्त्वाचे Topics

3. अर्थशास्त्र

2025: 15 प्रश्न

🔴 अति महत्त्वाचे

  • सार्वजनिक वित्त
  • भारतीय करसंरचना
  • दारिद्र्य व बेरोजगारी
  • बँकिंग
  • शासकीय योजना
  • राष्ट्रीय उत्पन्न
  • भारताचा परकीय व्यापार

🟡 महत्त्वाचे

  • आर्थिक नियोजन व पंचवार्षिक योजना
  • भारतातील आर्थिक सुधारणा
  • व्यापारतोल व व्यवहारतोल
  • लोकसंख्या
  • कृषी, उद्योग व सेवा

4. पॉलिटी

2025: 15 प्रश्न

🔴 अति महत्त्वाचे

  • घटनात्मक व बिगरघटनात्मक आयोग
  • राज्यपाल
  • मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ
  • उच्च न्यायालय
  • मूलभूत हक्क
  • मार्गदर्शक तत्त्वे
  • मूलभूत कर्तव्ये
  • सूची
  • महत्त्वाची कलमे
  • ग्रामप्रशासन

🟡 महत्त्वाचे

  • घटना निर्मिती
  • विधानमंडळ
  • सर्वोच्च न्यायालय
  • संसद
  • पंतप्रधान व मंत्रिमंडळ
  • आणीबाणी
  • केंद्रशासित प्रदेश
  • केंद्र व राज्य संबंध
  • महान्यायवादी

2. भूगोल

2025: 10 प्रश्न

🔴 अति महत्त्वाचे

  • महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल
  • नदीप्रणाली
  • लोकसंख्या
  • वाहतूक व पर्यटन स्थळे
  • खनिज संपत्ती

🟡 महत्त्वाचे

  • महाराष्ट्राचा स्थान व विस्तार
  • हवामान
  • मृदा व जलसिंचन
  • भारताचा भूगोल
  • कृषी
  • खनिज संपत्ती
  • उद्योगधंदे
  • स्थलांतर
  • नदीप्रणाली

1. इतिहास

2025: 10 प्रश्न

🔴 अति महत्त्वाचे: भारताचा इतिहास

  • गव्हर्नर जनरल्स (1765 ते 1947)
  • कायदे: 1909, 1919 व 1935
  • 1857 चा उठाव
  • भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
  • 1857 नंतरचे उठाव: शेतकरी, आदिवासी इ.

🔴 अति महत्त्वाचे: महाराष्ट्राचा इतिहास

  • समाजसुधारक
  • 1857 चा उठाव आणि महाराष्ट्र
  • शिक्षण व वृत्तपत्रे
  • ब्राह्मणोत्तर चळवळ

🟡 महत्त्वाचे: भारताचा इतिहास

  • महत्त्वाच्या राष्ट्रीय संघटना
  • मवाळ व जहाल गट
  • महत्त्वाच्या राष्ट्रीय चळवळी
  • सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी
  • क्रांतिकारी व साम्यवादी चळवळी

🟡 महत्त्वाचे: महाराष्ट्राचा इतिहास

  • महाराष्ट्रातील संघटना
  • महाराष्ट्रातील राष्ट्रीय चळवळ
  • महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळ
  • महाराष्ट्रातील समाजसुधारक
  • संयुक्त महाराष्ट्र व मराठवाडा मुक्तिसंग्राम

5. चालू घडामोडी

2025: 15 प्रश्न

🔴 अति महत्त्वाचे

  • शासकीय योजना, धोरणे व पोर्टल्स
  • व्यक्तीविशेष
  • पुरस्कार व पुस्तके
  • महाराष्ट्र घडामोडी
  • आर्थिक व सामाजिक घडामोडी

🟡 महत्त्वाचे

  • क्रीडा
  • जागतिक घडामोडी
  • राष्ट्रीय घडामोडी
  • राजकीय घडामोडी
  • पर्यावरण
  • संरक्षण व अंतरिक्ष

6. विज्ञान

2025: 15 प्रश्न

🔴 अति महत्त्वाचे

Biology
  • पचनसंस्था
  • वनस्पतींचे वर्गीकरण
  • प्राण्यांचे वर्गीकरण
  • रोग
  • वनस्पतीशास्त्र
Chemistry
  • द्रव्य व त्याचे स्वरूप
  • अणूची संरचना
  • खनिजे व धातुके
Physics
  • ध्वनी
  • प्रकाश
  • विद्युतधारा

🟡 महत्त्वाचे

Biology
  • प्रजनन संस्था
  • मानवातील ग्रंथी व संप्रेरके
  • रक्ताभिसरण संस्था
Chemistry
  • मूलद्रव्यांचे वर्गीकरण
  • कार्बनचे जग
  • आम्ल व आम्लारी
  • रासायनिक अभिक्रिया
Physics
  • गती, बल व चाल
  • गुरुत्वाकर्षण बल
  • कार्य, ऊर्जा व शक्ती

7. बुद्धिमत्ता / Reasoning

2025: Math + Reasoning = 20

🔴 अति महत्त्वाचे

  • सांकेतिक तुलना
  • आकृतींवर आधारित तर्कक्षमता
  • दिशाज्ञान चाचणी
  • बैठक व्यवस्था
  • खरे-खोटे
  • वजन, उंची, वय

🟡 महत्त्वाचे

  • ठोकळा
  • कालमापन
  • घड्याळ
  • सांकेतिक भाषा
  • नातेसंबंध
  • रांगेतील क्रमांक

🎯 2025 Trend नुसार Preparation Priority

🔴 Priority 1: गणित + बुद्धिमत्ता

2025 मध्ये एकत्रित 20 प्रश्न. नियमित सराव आणि प्रश्न सोडवण्याचा वेग महत्त्वाचा.

🟡 Priority 2: 15 प्रश्नांचे विषय

अर्थशास्त्र, पॉलिटी, चालू घडामोडी आणि विज्ञान. 2025 मध्ये या चार विषयांतून मिळून 60 प्रश्न आले.

🟢 Priority 3: इतिहास + भूगोल

2025 मध्ये प्रत्येकी 10 प्रश्न आले. प्रश्नसंख्या कमी असली तरी या दोन्ही विषयांतील महत्त्वाचे static topics आणि PYQ दुर्लक्षित करू नका.

📝 MPSC Group B Prelims: थोडक्यात

प्रश्नांचा प्रकार Objective / बहुपर्यायी
एकूण प्रश्न 100
एकूण गुण 100
वेळ 1 तास
दर्जा पदवी

Group B ची संपूर्ण परीक्षा पद्धत, Main Examination आणि निवड प्रक्रिया पाहण्यासाठी:

📝 MPSC Group B Exam Pattern 2026 पाहा

📘 MPSC Group B Complete Syllabus

Prelims आणि Mains चा संपूर्ण अभ्यासक्रम तसेच syllabus PDF पाहण्यासाठी:

📘 MPSC Group B Complete Syllabus 2026 पाहा

💡 तयारीची योग्य पद्धत

  • सर्वप्रथम अधिकृत syllabus पूर्ण समजून घ्या.
  • 2025 च्या प्रश्नवाटपाचा reference म्हणून वापर करा.
  • प्रत्येक विषयातील 🔴 अति महत्त्वाचे topics आधी मजबूत करा.
  • त्यानंतर 🟡 महत्त्वाच्या topics ची coverage पूर्ण करा.
  • प्रत्येक topic नंतर संबंधित मागील वर्षांचे PYQ सोडवा.
  • एका वर्षाच्या प्रश्नवाटपावर पूर्णपणे अवलंबून राहू नका.
  • Revision आणि नियमित mock test साठी स्वतंत्र वेळ ठेवा.
महत्त्वाची सूचना:
या पोस्टमधील 2025 चे प्रश्नवाटप हे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेच्या subject-wise analysis वर आधारित आहे. पुढील परीक्षेत प्रश्नांचे वितरण बदलू शकते.