MPSC RESOURCE HUB महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी प्रश्नपत्रिका, विश्लेषण व अभ्याससाहित्य
PDF • PYQ • SYLLABUS • ANALYSIS

MPSC गट-क पूर्व परीक्षा अभ्यासक्रम 2026 PDF Download | महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सिलॅबस | MPSC Group C Pre 2026 Syllabus PDF Free | MPSC Gat K Pariksha 2026

MPSC गट-क पूर्व परीक्षा अभ्यासक्रम 2026 (MPSC Group C Prelims Syllabus 2026): महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अंतर्गत एकूण 16,717 पदे (27 संवर्ग) भरली जाणार आहेत. या सर्व 27 संवर्गांसाठी एकच सामाईक पूर्व परीक्षा (Combined Preliminary Examination) घेतली जाते. खाली सर्व 27 पदांची नावे, परीक्षेचे टप्पे, परीक्षा योजना (Exam Pattern), सविस्तर अभ्यासक्रम आणि आयोगाचे अधिकृत अभ्यासक्रम पेज डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिले आहे.

परीक्षेची थोडक्यात माहिती (Quick Overview):
• परीक्षेचे नाव: महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 (MPSC Group-C Services Combined Prelims)
• एकूण पदसंख्या: 16,717 पदे (27 संवर्ग)
• पूर्व परीक्षा दिनांक: 24 जानेवारी 2027
• अधिकृत संकेतस्थळ: mpsc.gov.in

1. MPSC गट-क पूर्व परीक्षा 2026 अंतर्गत येणारी सर्व 27 पदे (संपूर्ण यादी)

खालील तक्त्यामध्ये दिलेल्या सर्व 27 पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम समान आहे. तुम्ही ज्या पदासाठी तयारी करत आहात ते पद आणि त्याची पदसंख्या खाली तपासू शकता:

अ.क्र. जाहिरातीमधील संवर्ग (पदाचे नाव) पदसंख्या
१उद्योग निरीक्षक (Industry Inspector)९
२तांत्रिक सहायक (Technical Assistant)३
३कर सहायक (Tax Assistant)२८२
४सहायक मोटार वाहन निरीक्षक, गट-क (AMVI)४६१
५लिपिक-टंकलेखक - विविध नियुक्ती प्राधिकारी (Clerk-Typist)३९६६
६ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क - विविध नियुक्ती प्राधिकारी (Talathi)१८४०
७वरिष्ठ अभिलेखापाल / वरिष्ठ लिपिक / अभिलेखापाल, गट-क (Senior Clerk)१९६
८सहायक अधीक्षक, गट-क (Assistant Superintendent)११
९सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी तांत्रिक, गट-क (Fisheries Development Officer)२५४
१०कनिष्ठ कौशल्य, रोजगार व मार्गदर्शन अधिकारी (Junior Skill & Employment Officer)३२
११कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी (Junior Education Extension Officer)५८
१२आदिवासी विकास निरीक्षक (Tribal Development Inspector)४७
१३अन्वेषक (Investigator)४२
१४दूरध्वनीचालक (Telephone Operator)१
१५पुरवठा निरीक्षक (Supply Inspector)२१४
१६उपलेखापाल / मुख्य लिपिक (Sub-Accountant / Head Clerk)३
१७सहायक भांडारपाल (Assistant Storekeeper)६
१८पशुधन पर्यवेक्षक (Livestock Supervisor)३२२
१९स्थापत्य अभियांत्रिकी सहायक (Civil Engineering Assistant - विभाग १)९३४
२०गणित व चित्रकला निदेशक (Maths & Drawing Instructor)२४१
२१सहायक भांडारपाल (Assistant Storekeeper - विभाग २)१८२
२२भांडारपाल (Storekeeper)९
२३शिल्प निदेशक (Craft Instructor)१३८८
२४अधिपरिचारिका (Staff Nurse)३९११
२५कनिष्ठ रसायनी (Junior Chemist)१५३
२६सहायक कृषी अधिकारी (Assistant Agriculture Officer)१२०३
२७स्थापत्य अभियांत्रिकी सहायक (Civil Engineering Assistant - विभाग २)९४९
एकूण पदसंख्या (Total Vacancies): १६७१७

2. परीक्षेचे टप्पे (Stages of Examination)

  • १. संयुक्त पूर्व परीक्षा: १०० गुण (सर्व पदांसाठी अनिवार्य).
  • २. पदनिहाय वेगळी  किंवा  संयुक्त मुख्य परीक्षा: 

3. परीक्षा योजना आणि नकारात्मक गुणदान (Exam Pattern & Negative Marking)

प्रश्नपत्रिकांची संख्या: एक

  • विषय व संकेतांक: सामान्य क्षमता चाचणी (संकेतांक क्र. ११२२)
  • प्रश्नसंख्या व एकूण गुण: १०० प्रश्न | १०० गुण
  • दर्जा व माध्यम: पदवी (Degree) | मराठी व इंग्रजी
  • परीक्षेचा कालावधी: १ तास (६० मिनिटे)
  • प्रश्नपत्रिकेचे स्वरूप: वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (Objective MCQ)
नकारात्मक गुणदान (Negative Marking Rules):
  1. प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता २५% किंवा १/४ एवढे गुण एकूण गुणांमधून वजा/कमी करण्यात येतील.
  2. एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अथवा उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल, तर ते उत्तर चुकीचे समजून २५% किंवा १/४ गुण वजा केले जातील.
  3. अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील व त्याआधारे पुढील कार्यवाही केली जाईल.
  4. एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित (रिकामे) ठेवल्यास नकारात्मक गुणपद्धत लागू असणार नाही.

4. सविस्तर पूर्व परीक्षा अभ्यासक्रम (MPSC Group C Prelims Syllabus)

सामान्य क्षमता चाचणी (General Ability Test) या पेपरमध्ये खालील ८ विषयांचा समावेश आहे:

  1. इतिहास: आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास.
  2. भूगोल: महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह - पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी.
  3. अर्थव्यवस्था:
    • भारतीय अर्थव्यवस्था: राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती, इत्यादी.
    • शासकीय अर्थव्यवस्था: अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी.
  4. चालू घडामोडी: जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील चालू घडामोडी.
  5. राज्यशास्त्र: भारतीय राज्यघटना, संसद, राज्य विधिमंडळ, स्थानिक स्वराज्य संस्था व प्रशासन.
  6. सामान्य विज्ञान: भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), प्राणिशास्त्र (Zoology), वनस्पतीशास्त्र (Botany), आरोग्यशास्त्र (Hygiene).
  7. अंकगणित: बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी इत्यादी.
  8. बुद्धिमापन चाचणी: उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न.

5. MPSC अधिकृत अभ्यासक्रम प्रत (Official Syllabus Page Download)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्ध केलेला गट-क संयुक्त पूर्व परीक्षेचा अधिकृत अभ्यासक्रम खाली पहा किंवा डाउनलोड बटणावर क्लिक करून तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा:

6. विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या लिंक्स (Important Links)