MPSC RESOURCE HUB महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी प्रश्नपत्रिका, विश्लेषण व अभ्याससाहित्य
PDF • PYQ • SYLLABUS • ANALYSIS

MPSC Polity Quiz Topic 1: ऐतिहासिक पार्श्वभूमी (१७७३ ते १८५८ चे कायदे)

MPSC सराव प्रश्न

गट-क पूर्व परीक्षा 2026

MPSC सराव प्रश्न | आगामी गट-क पूर्व परीक्षा 2026 साठी अत्यंत उपयुक्त

ब्रिटिशकालीन कायदे आणि प्रशासकीय सुधारणा या घटकावर आधारित महत्त्वाचे सराव प्रश्न सोडवा. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तपासून त्यामागील स्पष्टीकरण समजून घ्या.

📝 एकूण प्रश्न : 20 📚 विषय : राज्यव्यवस्था (राज्यघटना) 🎯 परीक्षा : गट-क पूर्व 2026

१. कलकत्ता येथे 'सर्वोच्च न्यायालयाची' (Supreme Court) स्थापना कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली?

उत्तर: १) १७७३ चा नियामक कायदा
स्पष्टीकरण: या कायद्यानुसार १७७४ मध्ये कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालय स्थापन झाले, ज्यात १ मुख्य आणि ३ इतर न्यायाधीश होते.

२. 'दुहेरी शासन व्यवस्था' (Double Government) भारतात कोणत्या कायद्याने लागू करण्यात आली?

उत्तर: २) १७८४ चा पिट्स इंडिया कायदा
स्पष्टीकरण: १७८४ च्या पिट्स कायद्याने व्यापारी कार्यांसाठी 'संचालक मंडळ' आणि राजकीय कार्यांसाठी 'नियामक मंडळ' स्थापन करून दुहेरी शासन व्यवस्था लागू केली.

३. भारतीयांच्या शिक्षणासाठी दरवर्षी एक लाख रुपये खर्च करण्याची तरतूद कोणत्या कायद्यात होती?

उत्तर: २) १८१३ चा सनदी कायदा
स्पष्टीकरण: १८१३ च्या सनदी कायद्याने शिक्षणासाठी १ लाख रुपये देण्याची तरतूद केली व ख्रिश्चन मिशनऱ्यांना भारतात धर्मप्रसाराची परवानगी दिली.

४. ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापारी मक्तेदारी 'पूर्णपणे' कोणत्या कायद्याने संपुष्टात आणली?

उत्तर: ३) १८३३ चा कायदा
स्पष्टीकरण: १८१३ मध्ये मक्तेदारी 'अंशतः' संपली होती (चहा व चीनचा व्यापार कंपनीकडे होता). १८३३ च्या कायद्याने ती पूर्णपणे संपुष्टात आली आणि कंपनी केवळ प्रशासकीय संस्था बनली.

५. 'भारताचा पहिला गव्हर्नर जनरल' (Governor General of India) बनण्याचा मान खालीलपैकी कोणाला मिळाला?

उत्तर: २) लॉर्ड विल्यम बेंटिक
स्पष्टीकरण: १८३३ च्या कायद्याने 'बंगालचा गव्हर्नर जनरल' हा 'भारताचा गव्हर्नर जनरल' बनला. (वॉरन हेस्टिंग्ज हा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल होता).

६. नागरी सेवांमध्ये भारतीयांसाठी 'खुली स्पर्धा परीक्षा' पद्धत कोणत्या कायद्याने सुरू करण्यात आली?

उत्तर: ३) १८५३ चा कायदा
स्पष्टीकरण: १८५३ च्या कायद्यानुसार नागरी सेवांमध्ये भरतीसाठी खुली स्पर्धा सुरू झाली आणि त्यासाठी १८५४ मध्ये मॅकॉले समिती नेमण्यात आली.

७. १८५८ च्या भारत सरकार कायद्यान्वये 'भारताचा पहिला व्हाईसरॉय' (Viceroy) म्हणून कोणाची नियुक्ती झाली?

उत्तर: ४) लॉर्ड कॅनिंग
स्पष्टीकरण: १८५८ च्या कायद्याने भारताचा गव्हर्नर जनरल हे पद 'व्हाईसरॉय' असे बदलण्यात आले आणि लॉर्ड कॅनिंग पहिला व्हाईसरॉय ठरला.

८. 'भारतमंत्री' (Secretary of State for India) हे नवीन पद कोणत्या कायद्याने निर्माण करण्यात आले?

उत्तर: ४) १८५८ चा कायदा
स्पष्टीकरण: ब्रिटिश संसदेत एक मंत्री म्हणून भारतमंत्र्याची नियुक्ती झाली आणि त्याच्या मदतीसाठी १५ सदस्यांचे 'इंडिया कौन्सिल' स्थापन करण्यात आले.

९. १८५३ च्या कायद्यानुसार स्थापन झालेल्या 'मॅकॉले समिती'चे (Macaulay Committee) स्थापना वर्ष कोणते?

उत्तर: ३) १८५४
स्पष्टीकरण: भारतीय नागरी सेवांसंदर्भात लॉर्ड मॅकॉले यांच्या अध्यक्षतेखाली १८५४ मध्ये ही समिती नेमण्यात आली.

१०. मद्रास आणि बॉम्बेच्या गव्हर्नरला 'बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या' दुय्यम (Subordinate) कोणत्या कायद्याने बनवण्यात आले?

उत्तर: १) १७७३ चा नियामक कायदा
स्पष्टीकरण: या कायद्याने प्रशासकीय केंद्रीकरणाची सुरुवात केली आणि मद्रास व बॉम्बे इलाखे बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या नियंत्रणाखाली आणले.

११. १८१३ च्या सनदी कायद्याबाबत खालील विधाने विचारात घ्या:

अ. या कायद्याने कंपनीची व्यापारी मक्तेदारी पूर्णपणे संपुष्टात आणली.
ब. या कायद्याने ख्रिश्चन मिशनऱ्यांना भारतात धर्मप्रसाराची परवानगी दिली.
क. चहाचा व्यापार आणि चीनसोबतचा व्यापार यावरील कंपनीचा एकाधिकार कायम ठेवण्यात आला.

वरीलपैकी अचूक विधाने कोणती?

उत्तर: २) फक्त ब आणि क
स्पष्टीकरण: विधान 'अ' चुकीचे आहे कारण मक्तेदारी १८१३ मध्ये 'अंशतः' संपली होती (चहा आणि चीनचा व्यापार शिल्लक होता). ती १८३३ मध्ये पूर्णपणे संपली.

१२. १८३३ च्या सनदी कायद्याबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

उत्तर: ४) या कायद्याने नागरी सेवांमध्ये भरतीसाठी 'खुली स्पर्धा परीक्षा' पद्धत प्रत्यक्ष सुरू केली.
स्पष्टीकरण: १८३३ मध्ये तसा 'प्रयत्न' झाला होता पण कोर्ट ऑफ डायरेक्टर्सच्या विरोधामुळे तो रद्द झाला. प्रत्यक्षात ही पद्धत १८५३ च्या कायद्याने सुरू झाली.

१३. १८५८ च्या भारत सरकार कायद्याबाबत खालील विधाने तपासा:

अ. या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपवून ब्रिटिश राजघराण्याची (Crown) राजवट सुरू केली.
ब. या कायद्याने 'दुहेरी शासन व्यवस्था' (Double Government) संपुष्टात आणली.
क. या कायद्यानुसार लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाईसरॉय ठरला.

वरीलपैकी बरोबर विधाने कोणती?

उत्तर: ४) अ, ब आणि क सर्व
स्पष्टीकरण: १८५७ च्या उठवानंतर आलेल्या या कायद्याने हे तीनही अत्यंत महत्त्वाचे प्रशासकीय बदल केले.

१४. विधान (A) आणि कारण (R) विचारात घ्या आणि योग्य पर्याय निवडा:

विधान (A): १८५८ च्या भारत सरकार कायद्याने भारतातील 'दुहेरी शासन व्यवस्था' संपुष्टात आणली.
कारण (R): १८५८ च्या कायद्याने १७८४ च्या पिट्स कायद्यान्वये निर्माण झालेले 'बोर्ड ऑफ कंट्रोल' आणि 'कोर्ट ऑफ डायरेक्टर्स' ही दोन्ही मंडळे रद्द केली.

उत्तर: १) (A) व (R) हे दोन्ही बरोबर आहेत आणि (R) हे (A) चे अचूक स्पष्टीकरण आहे.
स्पष्टीकरण: दुहेरी शासन म्हणजे ही दोन मंडळेच होती. ती रद्द झाल्याने आपोआप दुहेरी शासन संपले.

१५. जोड्या लावा:

कायदे
अ. १७७३ चा कायदा
ब. १७८४ चा कायदा
क. १८३३ चा कायदा
ड. १८५८ चा कायदा

वैशिष्ट्ये
i. दुहेरी शासन व्यवस्था (Double Government) सुरू.
ii. भारतमंत्री (Secretary of State) पदाची निर्मिती.
iii. बंगालचा गव्हर्नर आता गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल बनला.
iv. बंगालचा गव्हर्नर जनरल आता भारताचा गव्हर्नर जनरल बनला.

उत्तर: १) अ-iii, ब-i, क-iv, ड-ii
स्पष्टीकरण: १७७३ (वॉरन हेस्टिंग्ज), १७८४ (बोर्ड ऑफ कंट्रोल), १८३३ (विल्यम बेंटिक), १८५८ (भारतमंत्री).

१६. गव्हर्नर जनरलच्या पदांसंदर्भात खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य (चुकीची) आहे?

उत्तर: ४) भारताचा पहिला कायदा सदस्य - लॉर्ड डलहौसी
स्पष्टीकरण: भारताचा पहिला कायदा सदस्य 'लॉर्ड मॅकॉले' हा होता (१८३३ च्या कायद्यानुसार), लॉर्ड डलहौसी नाही.

१७. १७८४ च्या पिट्स इंडिया कायद्यानुसार 'नियामक मंडळाकडे' (Board of Control) कोणते अधिकार देण्यात आले होते?

उत्तर: २) दिवाणी, लष्करी आणि महसुली (राजकीय) कार्यांचे नियंत्रण
स्पष्टीकरण: कंपनीच्या राजकीय कार्यांसाठी Board of Control आणि व्यापारी कार्यांसाठी Court of Directors अशी वाटणी केली होती.

१८. गव्हर्नर जनरलच्या परिषदेची 'कायदेविषयक कार्ये' (Legislative) आणि 'कार्यकारी कार्ये' (Executive) पहिल्यांदा कोणत्या कायद्याने वेगळी केली?

उत्तर: ४) १८५३ चा कायदा
स्पष्टीकरण: १८५३ च्या कायद्याने पहिल्यांदाच कार्यकारी मंडळ आणि कायदेमंडळ यात भेद केला आणि ६ नवीन सदस्यांचे 'मध्यवर्ती कायदेमंडळ' स्थापन केले.

१९. १८५८ च्या कायद्यानुसार स्थापन झालेल्या 'इंडिया कौन्सिल' (India Council) मध्ये किती सदस्य होते?

उत्तर: ३) १५ सदस्य
स्पष्टीकरण: भारतमंत्र्याला कारभारात मदत करण्यासाठी १५ सदस्यांचे हे सल्लागार मंडळ स्थापन करण्यात आले होते.

२०. बॉम्बे आणि मद्रास प्रांतांच्या गव्हर्नरचे 'कायदे करण्याचे अधिकार' कोणत्या कायद्याने पूर्णपणे काढून घेण्यात आले होते (ज्यामुळे केंद्रीकरणाचा उच्चांक गाठला गेला)?

उत्तर: ३) १८३३ चा कायदा
स्पष्टीकरण: १८३३ च्या कायद्याने संपूर्ण ब्रिटिश भारतासाठी कायदे करण्याचे एकाधिकार 'भारताच्या गव्हर्नर जनरलला' दिले आणि इतर प्रांतांचे कायदे करण्याचे अधिकार काढून घेतले.