MPSC Previous Year Question Paper
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023
प्रश्नपत्रिका, उत्तरतालिका आणि विषयनिहाय प्रश्न विश्लेषण
Prelims 2023 · 100 प्रश्न · 100 गुणMPSC Group C Prelims 2023 Question Paper PDF आणि Answer Key या पेजवर उपलब्ध आहे. महाराष्ट्र गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 ही 30 एप्रिल 2023 रोजी आयोजित करण्यात आली होती. येथे प्रश्नपत्रिका पाहा किंवा डाउनलोड करा. तसेच परीक्षेतील 100 प्रश्नांचे Subject-Wise आणि Topic-Wise Analysis सात विषयांनुसार पाहता येईल.
01 परीक्षेची माहिती (Exam Overview)
| परीक्षेचे नाव | महाराष्ट्र गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 |
| परीक्षा दिनांक | 30 एप्रिल 2023 |
| एकूण प्रश्न | 100 |
| एकूण गुण | 100 |
| परीक्षा वेळ | 1 तास (60 मिनिटे) |
| नकारात्मक गुण | प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 गुण |
02 प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका (Question Paper & Answer Key PDF)
एकत्रित PDF: MPSC Group C Prelims 2023 ची प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका एकाच PDF मधून पाहा किंवा डाउनलोड करा.
PDF दिसत नसल्यास वरील VIEW PDF बटणावर क्लिक करा किंवा DOWNLOAD PDF वापरा.
03 विषयानुसार प्रश्नसंख्या (Subject-Wise Question Count)
| विषय | प्रश्नसंख्या |
|---|---|
| इतिहास | 10 |
| भूगोल व पर्यावरण | 10 |
| अर्थव्यवस्था | 15 |
| चालू घडामोडी | 15 |
| राज्यशास्त्र व शासनप्रणाली | 15 |
| सामान्य विज्ञान | 15 |
| अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी | 20 |
| एकूण | 100 |
04 विचारलेल्या प्रश्नांचे विषयानुसार व Topicwise प्रश्नविश्लेषण पहा
खालील सात विषयांपैकी कोणत्याही विषयावर क्लिक करा. त्या विषयातील प्रश्न क्रमांक आणि प्रश्नांचा संक्षिप्त आशय लगेच पाहता येईल.
1. इतिहास (History)10 प्रश्न · प्र. 1 ते 10
कामगार चळवळ
- प्र. 1नारायण मेघाजी लोखंडे यांना ‘बॉम्बे मिल हॅण्ड असोसिएशन’ स्थापनेत मदत करणारे सहकारी: केशवराव बागडे, केशवराव बोले, रघु भिकाजी इत्यादी.
सामाजिक चळवळी
- प्र. 3प्रार्थना समाजाची स्थापना (31 मार्च 1867), ‘सुबोध पत्रिका’, ‘सोशल सर्व्हिस लीग’ व संस्थात्मक कार्य.
1857 चा उठाव
- प्र. 2शिंदे व निजाम उठावात सहभागी झाले असते तर उठाव यशस्वी झाला असता, असे विधान करणारे गव्हर्नर जनरल: लॉर्ड कॅनिंग.
- प्र. 51857 च्या उठावाच्या वेळी महत्त्वाची भूमिका बजावणारे ब्रिटिश सेनानी: नील, हॅवलॉक, औटरॅम, लॉरेन्स बंधू, कॅम्पबेल आणि सर ह्यूम रोज.
राजकीय व सामाजिक संस्था
- प्र. 4हिंदू महासभेची स्थापना (1915, हरिद्वार), अध्यक्ष तसेच नागपूर आणि पुणे अधिवेशनाशी संबंधित विधाने.
शेतकरी व क्रांतिकारी चळवळी
- प्र. 61875 च्या डेक्कन दंगली / शेतकऱ्यांच्या उठावाचे भाग: शिरूर, पारनेर, इंदापूर, हवेली इत्यादी.
- प्र. 7क्रांतिकारक सेनापती बापट यांचा सहभाग: गोवा व हैदराबाद मुक्तिसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि सीमा आंदोलन.
राष्ट्रीय चळवळ, स्वदेशी व ब्रिटिश धोरणे
- प्र. 81919 च्या ब्रिटिश घटनात्मक सुधारणांची कारणे: क्रांतिकारी चळवळी, काँग्रेस-लीग करार आणि पहिले महायुद्ध.
- प्र. 91877 च्या दिल्ली दरबारात खादीचा पोशाख घालून उपस्थित राहून स्वदेशीचा श्रीगणेशा करणारे नेते: गणेश वासुदेव जोशी / सार्वजनिक काका.
- प्र. 10राष्ट्रीय सभेची (काँग्रेस) अधिवेशने व अध्यक्ष यांची जुळणी: 1889 मुंबई – वेडरबर्न, 1891 नागपूर – आनंदाचालू, 1895 पुणे – सुरेन्द्रनाथ बॅनर्जी, 1897 अमरावती – संकरन नायर.
2. भूगोल व पर्यावरण (Geography & Environment)10 प्रश्न · प्र. 11 ते 20
कृषी
- प्र. 11भारतात धवल क्रांतीची (White Revolution) सुरुवात.
महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल
- प्र. 12दख्खनच्या पठारावर ग्रामीण भागात घरबांधणीसाठी वापरला जाणारा स्थानिक दगड: बेसाल्ट.
- प्र. 14महाराष्ट्रातील पर्वतशिखरे व उंची यांची जुळणी: साल्हेर – 1,567 मीटर, मांगी-तुंगी, त्र्यंबकेश्वर आणि सप्तशृंगी.
- प्र. 20रायलसीमा पठाराचे भौगोलिक स्थान: कर्नाटक पठाराच्या पूर्वेला.
लोकसंख्या भूगोल (जनगणना 2011)
- प्र. 13भारतातील राज्यांची लोकसंख्या घनता यांची जुळणी: बिहार – 1,106, झारखंड, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश.
वाहतूक, पर्यटन व ऊर्जा साधने
- प्र. 15भारतातील पहिली रो-रो (Ro-Ro) रेल्वे वाहतूक: कोकण रेल्वे.
- प्र. 16भारतातील विविध राज्यांतील पर्यटन स्थळे यांची जुळणी.
- प्र. 19महाराष्ट्रातील औष्णिक वीज केंद्रे व जिल्हे यांची जुळणी: कोराडी – नागपूर, पारस – अकोला, उरण – ठाणे/रायगड, फेकरी – जळगाव.
वने
- प्र. 17चॅम्पियन आणि सेठ यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्रातील जंगलांचे प्रमुख प्रकार.
इतर
- प्र. 18भारत सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात सलग तीन वेळा (2019–2021) प्रथम आलेले शहर: इंदूर.
3. अर्थव्यवस्था (Economics)15 प्रश्न · प्र. 21 ते 35
दारिद्र्य
- प्र. 212011–12 च्या नियोजन आयोगाचे दारिद्र्यरेषेचे निकष: ग्रामीण ₹816 आणि शहरी ₹1,000.
- प्र. 33बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाचे (MPI) तीन मुख्य आयाम: आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान.
बेरोजगारी
- प्र. 262011–12 मधील श्रमशक्तीचे प्रमाण: स्वयंरोजगार 52%, नियमित 18% आणि प्रासंगिक 30%.
- प्र. 34जवाहर ग्राम समृद्धी व रोजगार शाश्वती योजनेचे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेत (SGRY) विलगीकरण: 2001.
योजना
- प्र. 22विशेष प्रदेश विकास कार्यक्रमाचे उद्दिष्ट: डोंगराळ, आदिवासी व दुष्काळग्रस्त भागाचा विकास.
- प्र. 27राष्ट्रीय खाद्यतेल-तेल पाम मिशनची सुरुवात: ऑगस्ट 2021.
- प्र. 28पीक विविधीकरण कार्यक्रम (CDP – 2013–14): राष्ट्रीय कृषी विकास योजनेची उपयोजना.
- प्र. 24उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजना (UDAY).
सार्वजनिक वित्त
- प्र. 23राजकोषीय धोरणाची साधने: सार्वजनिक खर्च, सार्वजनिक कर्ज, कर आकारणी व अर्थसंकल्प.
- प्र. 30केंद्रीय अर्थसंकल्प 2023–24 चे सात प्राधान्यक्रम (सप्तर्षी): सर्वसमावेशक विकास, हरित वाढ, युवासत्ता इत्यादी.
- प्र. 35FRBM कायदा 2003 अंतर्गत महसुली तूट दूर करण्याचे उद्दिष्ट वर्ष.
वित्त आयोग
- प्र. 3112 व्या वित्त आयोगाची राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतील केंद्र-राज्य वाट्याबाबतची शिफारस: 75:25.
कररचना
- प्र. 32GST मधील UTGST आणि IGST कर संकलन व रचना.
- प्र. 25ऑगस्ट 1991 मधील कर सुधारणा समिती: डॉ. राजा जे. चेलैया समिती.
बँकिंग
- प्र. 292021–22 मधील विस्तृत पैशांच्या पुरवठ्यातील (M3) घटक.
4. चालू घडामोडी (Current Affairs)15 प्रश्न · प्र. 36 ते 50
राष्ट्रीय घडामोडी
- प्र. 36भारतातील पहिले गोल्ड एटीएम (Gold ATM): हैदराबाद.
- प्र. 44भारतातील कोविड-19 चा पहिला रुग्ण: 30 जानेवारी 2020, केरळ.
तंत्रज्ञान व अॅप
- प्र. 382020 च्या लॉकडाऊन काळातील ‘किसान रथ’ मोबाईल अॅप.
- प्र. 47निवडणूक जनजागृतीसाठी ‘जागरूक मतदार’ मोहीम: Twitter/X.
राष्ट्रीय परिषदा व संस्था
- प्र. 40अखिल भारतीय राजभाषा परिषद 2022 चे यजमान शहर: सुरत.
- प्र. 42‘ॲन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट’ (ASER) प्रसिद्ध करणारी संस्था: प्रथम.
क्रीडा घडामोडी
- प्र. 37राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 2020: रोहित शर्मा.
- प्र. 41विस्डेनने निवडलेला 21 व्या शतकातील भारताचा सर्वात मौल्यवान कसोटी खेळाडू: रवींद्र जडेजा.
- प्र. 4621 ग्रँड स्लॅम जेतेपदे जिंकणारा पहिला पुरुष टेनिस खेळाडू: राफेल नदाल.
पुरस्कार, सन्मान व साहित्य
- प्र. 39पद्मविभूषण विजेत्या डॉ. प्रभा अत्रे यांचे क्षेत्र: संगीत.
- प्र. 482021 चा मरणोत्तर अशोकचक्र पुरस्कार: A.S.I. बाबू राम.
- प्र. 492021–22 चा 57 वा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोकणी/मराठी साहित्यिक: दामोदर मौजो.
- प्र. 50WHO तंबाखू विरोधी दिन पुरस्कार 2022 प्राप्त राज्य: झारखंड.
आंतरराष्ट्रीय घडामोडी
- प्र. 43अण्वस्त्र सुरक्षेवरील किव-मॉस्को संवाद स्थापन करणारी आंतरराष्ट्रीय संस्था: IAEA.
- प्र. 45‘अल मोहाद-अल हिंदी’ पहिला नौदल सराव: भारत व सौदी अरेबिया.
5. राज्यशास्त्र व शासनप्रणाली (Polity & Governance)15 प्रश्न · प्र. 51 ते 65
राज्य कार्यकारी मंडळ व कायदेविषयक पदे
- प्र. 51महाधिवक्ता (Advocate General): कलम 165 संबंधी विधाने.
- प्र. 54विधानपरिषद सभागृह नसलेली राज्ये: केरळ व राजस्थान.
न्यायव्यवस्था
- प्र. 52उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय: 62 वर्षे.
घटनादुरुस्त्या
- प्र. 55महत्त्वाच्या घटनादुरुस्त्यांची जुळणी: 61 वी – मतदानाचे वय 18 वर्षे; 41 वी – SPSC निवृत्ती वय 62; 73 वी – त्रिस्तरीय पंचायत राज.
- प्र. 58निवडणूक आयोगाच्या कर्तव्यांशी संबंधित घटनात्मक तरतूद: कलम 324, भाग 15.
पंचायतराज
- प्र. 53राष्ट्रीय पंचायतराज दिन: 24 एप्रिल.
- प्र. 56सरपंचाचे अधिकार व कर्तव्ये.
- प्र. 57सरकारिया आयोगाचे (Sarkaria Commission) सदस्य नसलेली व्यक्ती.
मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्त्वे
- प्र. 64अयोग्यरित्या जुळवलेली मूलभूत हक्क कलमे: जीवित संरक्षण हे कलम 20 ऐवजी कलम 21 अंतर्गत.
- प्र. 62मार्गदर्शक तत्त्वांचा (DPSP) कलमानुसार योग्य अनुक्रम.
घटनेची निर्मिती व राजकीय विचारवंत
- प्र. 59राजकीय विचारवंत व देश यांची जुळणी: थॉमस हॉब्ज, फ्रेडरिक हायेक, रॉबर्ट नॉझिक आणि रुसो.
- प्र. 60संविधान सभेच्या कार्यविषयक समितीचे अध्यक्ष: ग. वा. मावळणकर.
- प्र. 61राज्यघटनेचा पहिला मसुदा तयार करणारी सल्लागार शाखा: ऑक्टोबर 1947.
- प्र. 63माँटेग्यू-चेम्सफर्ड अहवाल प्रसिद्ध झाल्याचे वर्ष: जुलै 1918.
समवर्ती सूची
- प्र. 65समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट नसलेला घटक: जकात / Tolls (राज्य सूची).
6. सामान्य विज्ञान (General Science)15 प्रश्न · प्र. 66 ते 80
वनस्पतीशास्त्र व पेशीशास्त्र (Botany & Cytology)
- प्र. 66‘किटोफोरेल्स’ शैवाळ गटाचे वर्गीकरण: क्लोरोफायटा.
- प्र. 67वनस्पतींना अतिपाण्यामुळे मृत होण्याचे कारण: मुळांना ऑक्सिजन न मिळणे.
- प्र. 68नत्र स्थिरीकरणात प्रभावी शैवाळ: मीक्झोफायसी / Cyanophyceae.
- प्र. 69मिओसिस / अर्धसूत्री पेशी विभाजनाच्या टप्प्यांचा क्रम: लेप्टोटिन → झायगोटिन → पॅचीटिन → डिप्लोटिन → डायकायनेसिस.
प्राणीशास्त्र व रोगशास्त्र (Zoology & Pathology)
- प्र. 70शिस्टोमियासिस (Schistosomiasis) रोगावर अँटीमोनी संयुगांचा वापर.
- प्र. 71पोरिफेरा (Porifera) संघात गेमेट तयार करणाऱ्या पेशी: आर्किओसाईट्स.
भौतिकशास्त्र (Physics)
- प्र. 72तापमानात दर 1°C वाढीमुळे हवेतील ध्वनीचा वेग वाढण्याचे प्रमाण: 61 सेमी/सेकंद किंवा 0.61 मी/से.
- प्र. 73विशिष्ट उष्णतेचे CGS प्रणालीतील एकक: कॅलरी/ग्रॅम °C.
- प्र. 74विद्युतरोधात खर्च होणारी शक्ती: प्रवाहाच्या वर्गाच्या प्रमाणात (I²R).
आरोग्यशास्त्र व औषधशास्त्र (Hygiene & Pharmacology)
- प्र. 75डांग्या खोकल्यास (Whooping Cough) कारणीभूत जिवाणू: बॉर्डेटेला पर्युसिस.
- प्र. 76अँटीऑक्सिडंट (Antioxidant) म्हणून कार्य करणारे जीवनसत्त्व: जीवनसत्त्व E.
- प्र. 77मध्यवर्ती मज्जासंस्थेत चेतातंतूंवर बद्ध राहणारी औषधे: ओपिऑईड्स.
रसायनशास्त्र (Chemistry)
- प्र. 78जर्मन सिल्व्हर (German Silver) मिश्रधातूचे घटक: तांबे, निकेल आणि जस्त (Cu, Ni, Zn).
- प्र. 79ॲस्पिरिनचे (Aspirin) रासायनिक नाव: ओ-ॲसेटील सॅलिसिलीक ॲसिड.
- प्र. 80कठीण व मृदू आम्ल व आम्लारी (HSAB Concept) संज्ञा देणारे शास्त्रज्ञ: पियरसन.
7. अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी (Aptitude & Reasoning)20 प्रश्न · प्र. 81 ते 100
अंकगणित व भूमिती (Arithmetic & Geometry)
- प्र. 81वर्तुळाचे क्षेत्रफळ व परिघ समान असताना त्रिज्या शोधणे.
- प्र. 8215 शर्टची विक्री किंमत, तोटा व खरेदी किंमत काढणे.
- प्र. 83दशांश अपूर्णांकाचे सरळीकरण.
- प्र. 84वयाची सरासरी व 7 वर्षांपूर्वीचे गुणोत्तर.
- प्र. 8512% सरळव्याज दराने 3 वर्षांचे व्याज आणि मुद्दल.
- प्र. 865% वार्षिक घसारा दराने 2 वर्षांनंतर यंत्राची किंमत.
- प्र. 87रेल्वे प्रवास भाड्यातील लागोपाठची शेकडा वाढ.
- प्र. 88अपूर्णांक बेरीज व भागाकाराचे सरळीकरण.
- प्र. 8919 व्या डावात 98 धावा केल्यावर फलंदाजाची नवीन सरासरी.
- प्र. 90तीन वर्तुळांच्या क्षेत्रफळांच्या बेरजेइतके क्षेत्रफळ असलेल्या मोठ्या वर्तुळाची त्रिज्या.
बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)
- प्र. 91बुद्धिबळाच्या पटावरील एकूण चौरसांची संख्या: 204.
- प्र. 92संख्यामालिकेतील चुकीचे पद शोधणे.
- प्र. 93तार्किक विधान व अनुमाने (Syllogism).
- प्र. 94वयाचे गुणोत्तर व समीकरणावरून भावाचे वय.
- प्र. 95पूर्वेकडे तोंड करून बसलेल्या सात व्यक्तींची बैठक व्यवस्था.
- प्र. 96दिनदर्शिका: 2016 च्या योगा दिनावरून विज्ञान दिनाचा वार काढणे.
- प्र. 97संख्यामालिकेचा नियम व विसंगत संख्या.
- प्र. 98‘UNIDENTIFIED’ शब्दाची वर्णमालानुसार मांडणी केल्यास न बदलणारी अक्षरे.
- प्र. 99दिशा व अंतरज्ञान: 90° डावीकडे आणि 135° उजवीकडे वळणे.
- प्र. 100व्हेन आकृतीवरून योग्य घटक निवडणे.
05 पूर्व परीक्षेचा कट ऑफ
खाली पूर्व परीक्षेचा कट ऑफ पहा
कट ऑफची लिंक येथे नंतर जोडली जाईल.
06 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
1. MPSC Group C Prelims 2023 परीक्षा कधी आयोजित करण्यात आली होती?
महाराष्ट्र गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 30 एप्रिल 2023 रोजी आयोजित करण्यात आली होती.
2. MPSC गट-क पूर्व परीक्षा 2023 मध्ये विषयानुसार किती प्रश्न विचारले गेले?
एकूण 100 प्रश्नांमध्ये अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी (20), अर्थव्यवस्था (15), चालू घडामोडी (15), राज्यशास्त्र व शासनप्रणाली (15), सामान्य विज्ञान (15), इतिहास (10) आणि भूगोल व पर्यावरण (10) असे प्रश्नवाटप होते.
3. MPSC Group C Prelims 2023 Question Paper आणि Answer Key PDF कुठे मिळेल?
या पोस्टमधील 02. प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका या विभागातील VIEW PDF बटणावर क्लिक करून PDF पाहता येईल. DOWNLOAD PDF बटणाद्वारे ती डाउनलोड करता येईल.
4. गट-क संयुक्त पूर्व परीक्षेत नकारात्मक गुण (Negative Marking) किती असतात?
प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 (0.25) गुण वजा केले जातात.