MPSC Previous Year Question Paper
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026
प्रश्नपत्रिका, उत्तरतालिका आणि विषयनिहाय प्रश्न विश्लेषण
Group B Prelims 2026 · 100 प्रश्न · 100 गुणMPSC Group B Prelims 2026 Question Paper PDF आणि Answer Key येथे पाहा व डाउनलोड करा. महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 मधील प्रश्नांचे विषयानुसार वर्गीकरण, प्रश्नसंख्या आणि Topic-Wise Analysis या पेजवर दिले आहे. PSI, STI आणि ASO पदांसाठीच्या संयुक्त पूर्व परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मागील प्रश्नपत्रिकेचा सराव व विश्लेषण करण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरेल.
01 परीक्षेची माहिती (Exam Overview)
| परीक्षेचे नाव | महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 |
| जाहिरात क्रमांक | 011/2026 |
| परीक्षा दिनांक | 14 जून 2026 |
| एकूण प्रश्न | 100 |
| एकूण गुण | 100 |
| परीक्षा वेळ | 1 तास |
| नकारात्मक गुण | प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 (0.25) गुण |
02 प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका (Question Paper & Answer Key PDF)
PDF: MPSC Group B Prelims 2026 ची प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका पाहण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी खालील पर्याय वापरा.
PDF दिसत नसल्यास वरील VIEW PDF बटणावर क्लिक करा किंवा DOWNLOAD PDF वापरा.
03 मागील वर्षांच्या गट-ब पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका (Previous Year Papers)
गट-ब संयुक्त पूर्व परीक्षेच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका पाहण्यासाठी खालील पोस्ट उघडा.
04 विषयानुसार प्रश्नसंख्या (Subject-Wise Question Count)
| विषय | प्रश्नसंख्या |
|---|---|
| इतिहास (History) | 10 |
| भूगोल (Geography) | 10 |
| अर्थव्यवस्था (Economics) | 15 |
| चालू घडामोडी (Current Affairs) | 15 |
| राज्यशास्त्र व शासनप्रणाली (Polity & Governance) | 15 |
| सामान्य विज्ञान (General Science) | 15 |
| अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी (Aptitude & Reasoning) | 20 |
| एकूण | 100 |
05 विचारलेल्या प्रश्नांचे विषयानुसार व Topicwise प्रश्नविश्लेषण पहा
खालील सात विषयांपैकी कोणत्याही विषयावर क्लिक करा. त्या विषयातील प्रश्न क्रमांक, उपविषय आणि प्रश्नांचा संक्षिप्त आशय पाहता येईल.
१. इतिहास (History)10 प्रश्न · प्र. १ ते १०
अधिकृत अभ्यासक्रम घटक: आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास (सामाजिक व आर्थिक जागृती, महत्त्वाच्या व्यक्तींचे कार्य, समाजसुधारक, वर्तमानपत्रे, शिक्षण, १८५७ चा उठाव व राष्ट्रीय चळवळी).
राष्ट्रीय नेते व सामाजिक-राजकीय संस्था
- प्र. १ना. गोपाळ कृष्ण गोखले यांच्या कार्याबाबत विधाने (१८८७ सार्वजनिक सभेचे चिटणीस, १८९५ राष्ट्रीय सभेचे चिटणीस, १९०० केंद्रीय कायदेमंडळ सदस्य, पुणे सार्वजनिक सभा त्रैमासिक संपादक).
कामगार चळवळी व कामगार संघटना
- प्र. २३१ ऑक्टोबर १९२० रोजी मुंबईत लाला लजपत राय यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या 'ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस'च्या (AITUC) पहिल्या अधिवेशनाला गैरहजर असणाऱ्या व्यक्ती (महात्मा गांधी).
महाराष्ट्रातील समाजसुधारक व वृत्तपत्रे
- प्र. ३समाजसुधारक ओळखणे (एलफिंस्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर, १८४० मध्ये 'दिग्दर्शन' हे पहिले मराठी मासिक, १८४० मध्ये 'जस्टिस ऑफ पीस' - बाळशास्त्री जांभेकर).
- प्र. ४इ.स. १९१६ मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महिला विद्यापीठ स्थापनेमागील मुख्य उद्देश (स्त्रियांना उच्च शिक्षण देणे, स्वावलंबी बनवणे).
ब्रिटिश शासन व वसाहतवादाचे परिणाम
- प्र. ५भारतात वसाहतवादामुळे घडून आलेले बदल (राष्ट्रवादाच्या भावनेत वाढ, नागरीकरणाचा वेग वाढणे).
- प्र. ६"येथील लोक केवळ शिक्षण घेऊन स्वस्थ बसणार नाहीत, राज्यकारभारात वाटा मागतील..." हे विधान माउंट स्टुअर्ट एलफिंस्टन यांनी कोर्ट ऑफ डायरेक्टर्सना पाठवलेल्या पत्रात केले होते.
क्रांतिकारी चळवळी व सशस्त्र लढा
- प्र. ७क्रांतिकारी हत्या खटल्यांविषयी चुकीचे विधान ओळखणे (साँडर्स हत्या - भगतसिंग व राजगुरू, जॅक्सन हत्या - अनंत कान्हेरे, रँड हत्या - चाफेकर बंधू).
- प्र. १०लोकमान्य टिळकांनी बेत रायफली व काडतुसे बनवण्याचे शिक्षण घेण्यासाठी कोणाला नेपाळ येथे पाठवले होते? (कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर व दादासाहेब खापर्डे).
ब्रिटिश कायदे व राजकीय प्रतिक्रिया
- प्र. ८१९०९ च्या मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्याबद्दल "हे शुद्ध टोणग्याचे आचळ, यातून लोकहिताचे दूध मिळणे शक्य नाही" अशी प्रतिक्रिया देणारे नेते (लोकमान्य टिळक).
१८५७ चा उठाव
- प्र. ९१८५७ च्या बंडाबाबत "बंडवाल्यांना एक तरी समर्थ नेता मिळाला असता तर भारतावरील इंग्रजांचे राज्य नष्ट झाले असते" हे विधान करणारे (सर जॉन लॉरेन्स).
२. भूगोल (Geography)10 प्रश्न · प्र. ११ ते २०
अधिकृत अभ्यासक्रम घटक: महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह - प्राकृतिक रचना, हवामान, नद्या, खनिजे, वने, लोकसंख्या, स्थलांतर व कृषी विकास.
भारताचा प्राकृतिक भूगोल व हिमनद्या
- प्र. ११सियाचीन लडाखमधील 'रीमो' हिमनदी कोणत्या नदीमध्ये वाहते? (शोक नदी).
लोकसंख्या भूगोल व जनगणना २०११
- प्र. १२जनगणना २०११ विधाने (२००१ ते २०११ महाराष्ट्राचा लोकसंख्या वाढीचा दर १५.९९%, केरळमध्ये सर्वाधिक कृषी घनता, बाल लिंग गुणोत्तर टॉप १० राज्ये).
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग व जलस्रोत (तलाव/जलाशय)
- प्र. १३प्रशासकीय विभाग/जिल्हा व तलाव/जलाशय अयोग्य जोडी ओळखणे (छत्रपती संभाजी नगर/धाराशिव - तावरजा, अमरावती/वाशीम - चिखली).
महाराष्ट्रातील नदी प्रणाली व उपनद्या
- प्र. १४नद्या व उपनद्या योग्य जोड्या लावा (तापी - बोरी, पूर्णा - नळगंगा, सिंधफना - बिंदुसरा, मांजरा - घरणी).
महाराष्ट्रातील जिल्हे व विशेष ओळख
- प्र. १५विधानांवरून जिल्हा ओळखणे (तलावांचे शहर, दारूगोळा व शस्त्रनिर्मिती कारखाना, धातूच्या वस्तू व नक्षीकाम, मुशी गवत - ठाणे जिल्हा).
महाराष्ट्राची प्राकृतिक रचना व डोंगररांगा
- प्र. १६महाराष्ट्राच्या ईशान्य भागात स्थित असणाऱ्या टेकड्या/डोंगररांगा (दरकेसा टेकड्या).
- प्र. १९कोकण किनारपट्टीचा अरबी समुद्रासलग असणारा सखल सपाट भूभाग (खलाटी).
मानवी भूगोल व नागरीकरण
- प्र. १७'शहरी एकत्रीकरण' (Urban Agglomeration) या संकल्पनेत येणारी जोडी (मुंबई - नवी मुंबई).
ऊर्जा भूगोल व सौरऊर्जा प्रकल्प
- प्र. १८उत्तर महाराष्ट्रातील १५० मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? (धुळे जिल्हा).
कृषी भूगोल व संशोधन संस्था
- प्र. २०डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने संशोधित केलेले आंब्याचे वाण व विकसित करण्याचे वर्ष योग्य जोड्या (रत्ना - १९८१, सिंधू - १९९२, कोकण रुची - १९९९, कोकण सम्राट - २०१४).
३. अर्थव्यवस्था (Economics)15 प्रश्न · प्र. २१ ते ३५
अधिकृत अभ्यासक्रम घटक: भारतीय अर्थव्यवस्था (राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, मौद्रिक व राजकोषीय नीती) व शासकीय अर्थव्यवस्था (अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण).
भारतीय अर्थव्यवस्थेची संरचना व शेती
- प्र. २१भारतीय अर्थव्यवस्थेत २००४-०५ नंतर शेतीतील शेतमजूर घटणे हा कोणत्या प्रकारचा बदल आहे? (संरचनात्मक बदल / Structural Change).
बँकिंग व मौद्रिक धोरण (Monetary Policy)
- प्र. २२मौद्रिक धोरणाची संख्यात्मक साधने व उद्दिष्टे जोड्या (बँक दर, रोख राखीव प्रमाण CRR, वैधानिक रोखता प्रमाण SLR, खुल्या बाजारातील उलाढाल OMO).
- प्र. ३४भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) कार्यांमध्ये समाविष्ट नसलेले कार्य (शेअर बाजार नियमन - हे SEBI चे कार्य आहे).
राष्ट्रीय उत्पन्न (National Income)
- प्र. २३भारतात राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना येणाऱ्या मर्यादा/अडचणी (उत्पन्न वाटपाच्या आकडेवारीचा अभाव, न नोंदविलेले बेकायदेशीर उत्पन्न, लहान उत्पादकांचा सांख्यिकी डेटा न मिळणे).
- प्र. २७राष्ट्रीय उत्पन्नाबाबत विधाने (स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातून घसारा वजा केल्यास निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न NNP मिळते, दुहेरी मोजमाप टाळणे).
दारिद्र्य
- प्र. २४डॉ. एस. महेंद्र देव आणि सी. रवी यांनी दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्येची गणना करण्यासाठी कोणत्या खर्चाचा आधार घेतला? (कपडे, आरोग्य, ऊर्जा उपभोग, शिक्षण).
लोकसंख्याशास्त्र व मानवी विकास
- प्र. २५'लोकसंख्येचा लाभांश' (Demographic Dividend) या संकल्पनेत लाभांश म्हणजे काय? (काम करण्याच्या वयातील - १५ ते ६४ वर्षे - वाढलेली लोकसंख्या).
- प्र. ३५शिक्षणातील लैंगिक समता निर्देशांक (Gender Parity Index - GPI) मोजण्याची प्रमाणित पद्धत (विशिष्ट शिक्षण स्तरावर स्त्रियांचा GER व पुरुषांचा GER यांचे गुणोत्तर).
सार्वजनिक वित्त, अर्थसंकल्प
- प्र. २६अर्थसंकल्पातील विकासेतर खर्चामध्ये (Non-development expenditure) समाविष्ट होणारे घटक (पेन्शन, व्याजाची परतफेड, शिक्षण, प्रशासकीय सेवा).
- प्र. ३०प्राथमिक तूट (Primary Deficit) म्हणजे काय? (वित्तीय तूट व व्याज परतफेड यातील फरक).
- प्र. ३२केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४ मधील 'सप्तर्षी' प्राधान्य क्षेत्रांमध्ये समाविष्ट नसलेले क्षेत्र (व्यापार विकास).
औद्योगिक क्षेत्र व उत्पादन निर्देशांक
- प्र. २८२०२३-२४ मधील औद्योगिक उत्पादन निर्देशांक (IIP - ५.८% वाढ) व खाण क्षेत्रातील वाढ (१३%).
ग्रामीण विकास व रोजगार योजना
- प्र. २९स्वरोजगारासाठी युवकांना प्रशिक्षण देणारी TRYSEM योजना (१५ ऑगस्ट १९७९) व राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम (NREP - १९८०).
व्यावसायिक लेखापालन (Accountancy)
- प्र. ३१लेखाशास्त्रात 'लेखा' (Accounting) या शब्दाचा अर्थ (व्यवहारांची ओळख पटवणे, नोंद करणे, वर्गीकरण व संक्षेप करणे).
वैश्विकीकरण व उद्योग क्षेत्र
- प्र. ३३बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या (Multinational Corporations - MNCs) विस्ताराबाबत व रणनीतीबाबत योग्य विधाने.
४. चालू घडामोडी (Current Affairs)15 प्रश्न · प्र. ३६ ते ५०
अधिकृत अभ्यासक्रम घटक: जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील महत्त्वाच्या घडामोडी.
आंतरराष्ट्रीय परिषदा व जागतिक संघटना
- प्र. ३७१७ वी ब्रिक्स (BRICS) शिखर परिषद २०२५ मध्ये लक्ष केंद्रित केलेले विषय (जागतिक प्रशासन संस्था सुधारणा, बहुपक्षीयतेला प्रोत्साहन, AI नियंत्रणासाठी सर्वसमावेशक चौकटी).
- प्र. ३८संयुक्त राष्ट्र स्वयंसेवक (UNV) आणि २०२६ हे आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक वर्ष म्हणून घोषित करण्याबाबतची विधाने.
पुरस्कार
- प्र. ३६दुष्काळ सहन करणारी तांदळाची जात सादर केल्याबद्दल डॉ. स्वाती नायक यांना प्रतिष्ठित 'नॉर्मन बोरलॉग पुरस्कार' देण्यात आला (सहाभागी धान तांदूळ).
- प्र. ३९महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेत्यांचा पुरस्कार मिळाल्यानुसार चढता काळानुक्रम (राम सुतार, आप्पासाहेब धर्माधिकारी, अशोक सराफ, आशा भोसले).
कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) व तंत्रज्ञान
- प्र. ४०Khanmigo हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित AI ॲप आहे? (शिक्षण / Education).
- प्र. ४७ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या ब्ल्यू ओरिजन NS-25 मोहिमेत अंतराळात जाणारे पहिले भारतीय नागरिक (गोपीचंद थोटाकूरा).
पर्यावरण, कृषी तंत्रज्ञान व संवर्धन
- प्र. ४१कोणती बाब उभा शेतीचा (Vertical Farming) फायदा नाही? (शेतीयोग्य जमिनीवरील अवलंबित्व वाढणे - हा फायदा नसून दोष आहे).
- प्र. ४३'जंगलाचा विश्वकोश' (Encyclopaedia of the Forest) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्री विजेत्या (तुलसी गौडा).
आंतरराष्ट्रीय राजकीय घडामोडी व नियुक्त्या
- प्र. ४२एप्रिल २०२४ मध्ये आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारणारे व्यक्ती (सायमन हॅरिस).
राष्ट्रीय सुरक्षा व परिषदा
- प्र. ४४नवी दिल्ली येथे 'दहशतवाद विरोधी परिषद २०२४' आयोजित करणारी सरकारी संस्था (नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी / NIA).
राष्ट्रीय सामाजिक व महिला कल्याण योजना
- प्र. ४५'बेटी बचाओ बेटी पढाओ' योजनेचा मुख्य उद्देश (लिंग समानता व मुलींचे शिक्षण).
- प्र. ४६"मिशन शक्ती" योजना कशाशी संबंधित आहे? (महिला सक्षमीकरण / Women Empowerment).
राष्ट्रीय राजकीय घडामोडी
- प्र. ४८भारतातील २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडणूक लढणाऱ्या महिला उमेदवारांची एकूण संख्या (७९७ उमेदवार).
जागतिक व्यापार
- प्र. ४९LEGO ही जगप्रसिद्ध खेळणी बनवणारी कंपनी मूळची कोणत्या देशातील आहे? (डेन्मार्क / Denmark).
५. राज्यशास्त्र व शासनप्रणाली (Polity & Governance)15 प्रश्न · प्र. ५१ ते ६५
अधिकृत अभ्यासक्रम घटक: भारतीय संघ राज्यव्यवस्था, राज्यघटना निर्मिती, मूलभूत हक्क व कर्तव्ये, मार्गदर्शक तत्त्वे, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायव्यवस्था व स्थानिक स्वराज्य संस्था.
राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे (DPSP)
- प्र. ५१राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांबद्दल (DPSP) योग्य विधाने (गैर-न्यायप्रविष्ट, नैतिक व राजकीय आधार, समुदाय कल्याणाला प्रोत्साहन, अंमलबजावणीसाठी कायद्याची गरज).
- प्र. ६५मार्गदर्शक तत्त्वांचा भाग नसलेली तरतूद (शांततेने व शस्त्रांशिवाय एकत्र जमण्याची परवानगी - हा मूलभूत हक्क कलम १९(१)(b) आहे).
मूलभूत हक्क (Fundamental Rights)
- प्र. ५२भारतीय संविधानाच्या कलम २३ मध्ये समाविष्ट नसलेली बाब (सार्वजनिक उद्दिष्टांसाठी सक्तीची सेवा - ही अपवाद तरतूद आहे).
संविधान सभा व ऐतिहासिक पार्श्वभूमी
- प्र. ५३१९४७ च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थितीत केलेले बदल (संविधान सभा पूर्ण संप्रभू व विधीमंडळ संस्था बनली).
- प्र. ५५संविधानाच्या सरनाम्याची सुरुवात "आम्ही भारतीय लोक" (We the People) अशी असणारा इतर देश (युनायटेड स्टेट्स / अमेरिका).
- प्र. ६३सरनाम्यामध्ये कलम ३६८ अन्वये दुरुस्ती करता येते का? केशवानंद भारती खटला (१९७३) व ४२ वी घटनादुरुस्ती कायदा (१९७६) विधाने.
घटनात्मक संस्था व संवैधानिक पदे
- प्र. ५४राज्य लोकसेवा आयोगाच्या (SPSC) सदस्याला पदावरून काढून टाकण्याची पद्धत (सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या चौकशीनंतर राष्ट्रपतींद्वारे).
स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामीण व नागरी पंचायती राज)
- प्र. ५६सरपंच किंवा उपसरपंच यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मांडण्यापूर्वी किमान १/३ सभासदांच्या सहीची सूचना कोणाला द्यावी लागते? (तहसीलदार).
- प्र. ५८ग्रामपंचायत खालीलपैकी कोणता कर/शुल्क वसूल करू शकते? (घरपट्टी / House Tax).
- प्र. ५९भारतीय संविधानाच्या १२ व्या अनुसूचीमध्ये नगरपालिकांसाठी निश्चित केलेली कामे (नागरी दारिद्र्य निर्मूलन, आर्थिक-सामाजिक नियोजन, चर्मप्रक्रियेचे नियमन, नागरी वनीकरण).
- प्र. ६१उपलेखापरीक्षकाने एका वर्षात १०० ग्रामपंचायतींपैकी किमान किती मुख्य पंचायतींचे लेखा परीक्षण करणे आवश्यक असते? (१५ ग्रामपंचायती).
- प्र. ६२नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित असणारी घटनादुरुस्ती (७४ वी घटनादुरुस्ती).
न्यायव्यवस्था
- प्र. ५७खालीलपैकी कोणते न्यायालय हे 'अभिलेख न्यायालय' (Court of Record) मानले जाते? (सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालये).
राज्य विधीमंडळ
- प्र. ६०भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार प्रत्येक घटकराज्यात विधानसभा निर्माण केली आहे? (कलम १७०).
केंद्र-राज्य प्रशासकीय संबंध
- प्र. ६४केंद्र-राज्यांच्या प्रशासकीय संबंधांमधील कलमे व तरतुदी जोड्या जुळवा (कलम २५६ - राज्यांवर केंद्राचे नियंत्रण, कलम २५७ - राज्यांचे दायित्व, कलम २५८-A - केंद्रकाडे कार्य सोपवण्याचा राज्याचा अधिकार, कलम २६० - भारताबाहेरील प्रदेशाबाबत केंद्राचे अधिकारक्षेत्र).
६. सामान्य विज्ञान (General Science)15 प्रश्न · प्र. ६६ ते ८०
अधिकृत अभ्यासक्रम घटक: भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), प्राणीशास्त्र (Zoology), वनस्पतीशास्त्र (Botany), आरोग्यशास्त्र (Hygiene).
भौतिकशास्त्र (Physics) — प्रकाश, ऊर्जा व लहरी
- प्र. ६६क्ष-किरणांविषयी (X-rays) योग्य विधाने (सरळ रेषेत प्रवास करतात, सॉफ्ट क्ष-किरणांची तरंगलांबी हार्ड क्ष-किरणांपेक्षा जास्त असते).
- प्र. ६७अणू विखंडन (Nuclear Fission) अभिक्रियेबाबत सत्य विधाने (जड युरेनियम अणू वापरतात, प्रचंड ऊर्जा बाहेर पडते, न्यूट्रॉन्समुळे शृंखला अभिक्रिया घडते).
- प्र. ६८ध्वनी ऊर्जा (Sound Energy) म्हणजे काय? (यांत्रिक ऊर्जेचा कंपन करणारा स्रोत / Mechanical energy of vibrating source).
रसायनशास्त्र (Chemistry) — धातू, अणू व आवर्तसारणी
- प्र. ६९हॅमॅटाईट (Haematite) या अयस्कापासून कोणता धातू मिळवला जातो? (लोखंड / आयर्न - Fe).
- प्र. ७०आधुनिक आवर्तसारणी मधील 'p' गणात (p-block) समाविष्ट असणारे मूलद्रव्य (इंडियम - In).
- प्र. ७१_{92}\text{U}^{238} च्या अणूमध्ये किती न्यूट्रॉन्स असतात? (238 - 92 = 146 न्यूट्रॉन्स / पर्याय ब - अ).
प्राणीशास्त्र (Zoology) — वर्गीकरण व उभयचर
- प्र. ७२कोणता प्राणी निडारिया/कोएलेंटरेटा (Coelenterata) संघाशी संबंधित नाही? (समुद्री काकडी / Sea Cucumber - हा एकिनोडर्माटा संघात येतो).
- प्र. ७३कोणते उभयचर (Amphibians) प्राणी आंधळे असतात? (सीसीलियन / Caecilians).
- प्र. ७४डिप्लोडोकस (Diplodocus) हा डायनासोर कोणत्या सब-ऑर्डरशी संबंधित आहे? (सोरोपोडा / Sauropoda).
वनस्पतीशास्त्र (Botany) — रोग, मृदा व संवर्धन
- प्र. ७५मातीच्या/मृदेच्या उपजाऊ स्तरांच्या नुकसानीस काय म्हणतात? (मातीची धूप / Soil Erosion).
- प्र. ७६लिंबू पिकावरील 'कॅंकर' (Citrus Canker) रोग कोणत्या रोगकारकामुळे होतो? (झँथोमोनास सिट्रााय / Xanthomonas citri जिवाणू).
- प्र. ७७वनस्पतींच्या जोमदार वाढीसाठी सर्वोत्तम मृदा कोणती मानली जाते? (लोम माती / Loam Soil).
मानवी शरीरशास्त्र व आरोग्यशास्त्र (Anatomy & Hygiene)
- प्र. ७८सेरेब्रो-स्पायनल द्रव (CSF) बाबत विधाने (मेंदूला ऑक्सिजन पुरवणे, आघातप्रतिबंधक म्हणून काम करणे, मेंदूला पोषण पुरवणे).
- प्र. ७९मानवी शरीरात पाण्याचे संतुलन, रक्तातील क्षारांचे नियंत्रण, pH नियंत्रण व उत्सर्जनाचे कार्य प्रामुख्याने कोण करते? (वृक्क / मुत्रपिंड / Kidney).
- प्र. ८०कोणती जीवनसत्त्वे पाण्यात विद्राव्य (Water-soluble) आहेत? (जीवनसत्त्व B समूह आणि जीवनसत्त्व C).