MPSC RESOURCE HUB महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी प्रश्नपत्रिका, विश्लेषण व अभ्याससाहित्य
PDF • PYQ • SYLLABUS • ANALYSIS

MPSC Group B Prelims 2021 Question Paper PDF with Final Answer Key | गट-ब पूर्व परीक्षा 2021 प्रश्नपत्रिका व अंतिम उत्तरतालिका

MPSC Previous Year Question Paper

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021

प्रश्नपत्रिका, उत्तरतालिका आणि विषयनिहाय प्रश्न विश्लेषण

Prelims 2021 · 100 प्रश्न · 100 गुण

MPSC Group B Prelims 2021 Question Paper PDF आणि Answer Key या पेजवर उपलब्ध आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ही 26 फेब्रुवारी 2022 रोजी आयोजित करण्यात आली होती. या पेजवरून प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका पाहा किंवा डाउनलोड करा. तसेच परीक्षेतील 100 प्रश्नांचे Subject-Wise आणि Topic-Wise Analysis सात विषयांनुसार पाहता येईल.

01 परीक्षेची माहिती (Exam Overview)

परीक्षेचे नावमहाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021
जाहिरात क्रमांक249/2021
परीक्षा दिनांक26 फेब्रुवारी 2022
एकूण प्रश्न100
एकूण गुण100
परीक्षा वेळ1 तास (60 मिनिटे)
नकारात्मक गुणप्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 (0.25) गुण

02 प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका (Question Paper & Answer Key PDF)

एकत्रित PDF: MPSC Group B Prelims 2021 ची प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका एकाच PDF मधून पाहा किंवा डाउनलोड करा.

PDF दिसत नसल्यास वरील VIEW PDF बटणावर क्लिक करा किंवा DOWNLOAD PDF वापरा.

03 विषयानुसार प्रश्नसंख्या (Subject-Wise Question Count)

विषयप्रश्नसंख्या
राज्यशास्त्र व शासनप्रणाली (Polity & Governance)10
इतिहास (History)15
भूगोल (Geography)15
अर्थव्यवस्था (Economics)15
सामान्य विज्ञान (General Science)15
अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी (Aptitude & Reasoning)15
चालू घडामोडी (Current Affairs)15
एकूण100

04 विचारलेल्या प्रश्नांचे विषयानुसार व Topicwise प्रश्नविश्लेषण पहा

खालील सात विषयांपैकी कोणत्याही विषयावर क्लिक करा. त्या विषयातील प्रश्न क्रमांक आणि प्रश्नांचा संक्षिप्त आशय पाहता येईल.

1. राज्यशास्त्र व शासनप्रणाली (Polity & Governance)10 प्रश्न · प्र. 1 ते 10

अभ्यासक्रम घटक: भारतीय संघ राज्यव्यवस्था, राज्यघटना निर्मिती, घटनात्मक तरतुदी, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायव्यवस्था व स्थानिक स्वराज्य संस्था.

पंचायतराज

  • प्र. 1ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड, उपसरपंचांचे रिक्त पद भरणे आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या बैठकीस गैरहजेरीबाबतच्या कायदेशीर तरतुदी.
  • प्र. 2महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील 'ग्राम विकास समिती'ची रचना, सदस्य संख्या, महिला प्रतिनिधित्व व पदसिद्ध पदाधिकाऱ्यांबाबतच्या तरतुदी.
  • प्र. 8महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या बैठकांचे आयोजन, विशेष बैठक बोलावण्याची प्रक्रिया आणि अध्यक्ष/उपाध्यक्षांच्या अनुपस्थितीत सभेचे अध्यक्षस्थान भूषविण्याबाबतचे नियम.

घटनात्मक व वैधानिक आयोग

  • प्र. 3केंद्र-राज्य संबंधांशी संबंधित 'सरकारीया आयोगा'ने (Sarkaria Commission) राज्यपाल पद, अखिल भारतीय सेवा आणि आंतर-राज्य परिषदेबाबत दिलेल्या शिफारशी.

राज्य कार्यकारी मंडळ (महाधिवक्ता)

  • प्र. 4राज्याच्या महाधिवक्त्यांचा (Advocate General) पदावधी, मानधन निश्चिती आणि खाजगी पक्षासाठी वकील म्हणून काम करण्याबाबतच्या घटनात्मक मर्यादा.

शासन प्रणाली व कायदेमंडळ

  • प्र. 5संसदात्मक शासन पद्धतीमध्ये प्रशासनावरील कायदेमंडळाच्या नियंत्रणाचे स्वरूप आणि अध्यक्षात्मक पद्धतीशी असणारा त्याचा फरक.
  • प्र. 6राज्यघटनेतील 'अर्थ विधेयका'ची (Money Bill) मांडणी, राज्यपालांची पूर्वसंमती आणि विधानसभा व विधानपरिषदेच्या अधिकारांबाबतच्या तरतुदी.
  • प्र. 7संसदेला राज्यसूचीतील कोणत्याही विषयावर राष्ट्रीय हितासाठी कायदा करण्याचा अधिकार मिळण्यासाठी राज्यसभेने २/३ बहुमताने ठराव मंजूर करण्याबाबतचे कलम २४९.

न्यायव्यवस्था (उच्च न्यायालय)

  • प्र. 9राज्याच्या उच्च न्यायालयाची रचना, मुख्य न्यायाधीश आणि राष्ट्रपती ठरवतील तितके इतर न्यायाधीश यांचा समावेश असण्याबाबतची घटनात्मक तरतूद.

घटना निर्मिती प्रक्रिया

  • प्र. 10संविधान सभेतील विविध समित्या आणि 'कार्यपद्धतीविषयक नियम समिती'चे (Rules of Procedure Committee) अध्यक्षस्थान भूषविणारी व्यक्ती.
2. इतिहास (History)15 प्रश्न · प्र. 11 ते 25

अभ्यासक्रम घटक: आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास (सामाजिक व आर्थिक जागृती, समाजसुधारक, संस्था, वर्तमानपत्रे, १८५७ चा उठाव व कामगार चळवळी).

समाजसुधारक व संस्थात्मक कार्य

  • प्र. 11समाजसुधारक व त्यांनी स्थापन केलेल्या संस्था/उपक्रम: बाळशास्त्री जांभेकर (स्त्रीशिक्षणाचे पहिले पुरस्कर्ते), गोपाळ हरी देशमुख (पुनर्विवाहोत्तेजक मंडळी), महात्मा जोतीबा फुले (अनाथ बालकाश्रम), महर्षी धोंडो केशव कर्वे (विधवागृहाची स्थापना).
  • प्र. 15स्त्री सुधारक व त्यांच्या संस्था/ग्रंथ: पंडिता रमाबाई (शारदा सदन), रमाबाई रानडे (हिंदू लेडीज सोशल क्लब), ताराबाई शिंदे ('स्त्री-पुरुष तुलना' ग्रंथ), जनाक्का शिंदे (निराश्रित सेवासदन).
  • प्र. 21पंडिता रमाबाई यांच्या स्त्री शिक्षण व सामाजिक कार्याची दखल घेऊन ब्रिटीश सरकारने त्यांना दिलेला 'कैसर-ए-हिंद' किताब.
  • प्र. 24स्त्रीमुक्ती, बालविवाह विरोध व स्त्रीशिक्षणासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती: 'शारदा' नाटक (गोविंद बल्लाळ देवल), हंटर कमिशनपुढे साक्ष (पंडिता रमाबाई), शारदाश्रम (आनंदीबाई कर्वे), 'माझे पुराण' आत्मचरित्र (रमाबाई रानडे).

सामाजिक-धार्मिक जागृती व विचारवंत

  • प्र. 13"देशाची खरी उन्नती व्हावयाची असेल तर प्रथम उन्नत धर्माचा प्रसार झाला पाहिजे" हे धर्मजागृतीबाबतचे विचार मांडणारे विचारवंत.
  • प्र. 16१८४९ मध्ये मुंबई येथे स्थापन झालेल्या परमहंस सभेच्या मुख्य सामाजिक व धार्मिक सुधारणांच्या भर देण्याच्या बाबी.

वृत्तपत्रे व कामगार चळवळ

  • प्र. 14नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांच्या प्रश्नांना व हक्कांना वाचा फोडण्यासाठी चालवलेले 'दीनबंधू' वृत्तपत्र.
  • प्र. 17भारतीय कामगार वर्ग व चळवळीतील नेते आणि त्यांच्या संघटना: नारायण मेघाजी लोखंडे (दीनबंधू वृत्तपत्र), महात्मा गांधी (अहमदाबाद टेक्स्टाईल लेबर असोसिएशन), बी.पी. वाडिया (मद्रास लेबर युनियन), लाला लजपतराय (ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस).

ब्रिटिश आर्थिक प्रभाव व आर्थिक विचारवंत

  • प्र. 12१९३२ साली भारतीय उद्योजकांनी सुरू केलेली पहिली विमान कंपनी (टाटा एअरवेज लि.).
  • प्र. 18वसाहतवादाचे भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामांवर प्रकाश टाकणारे विचारवंत व त्यांची विधाने (रमेशचंद्र दत्त, न्यायमूर्ती रानडे, सर जॉर्ज ऑक्सेंडन, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख).
  • प्र. 19दादाभाई नौरोजी यांच्या मते भारतीय अर्थव्यवस्थेतून होणारे 'आर्थिक निसरण' (Drain of Wealth) आणि संभाव्य अधिशेष (Potential Surplus).
  • प्र. 20ब्रिटीश काळात भारतीय शेतीच्या व्यापारीकरणामुळे (Commercialization of Agriculture) विशिष्ट पिकांच्या उत्पादनात झालेली वाढ.

उठाव, क्रांती व १८५७ चे बंड

  • प्र. 22आदिवासी शेतकऱ्यांच्या क्रांतीचे पहिले नायक व नेतृत्व करणाऱ्या प्रमुख व्यक्ती.
  • प्र. 23१८५७ पूर्व काळातील नागरी उठावांची (Civil Rebellions) भारतातील सुरुवातीची भौगोलिक क्षेत्रे.
  • प्र. 25१८५७ च्या उठावातील महाराष्ट्रातील प्रमुख व्यक्तिमत्त्वे, भोरचे पंतसचिव, नागपूरचे भोसले घराणे, कोल्हापूरचे छत्रपती घराणे आणि रंगो बापूजी गुप्ते यांच्या सहकाऱ्यांचे कार्य.
3. भूगोल (Geography)15 प्रश्न · प्र. 26 ते 40

अभ्यासक्रम घटक: महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह - प्राकृतिक रचना, हवामान, नद्या, खनिजे, मृदा, वाहतूक, नागरीकरण व लोकसंख्याशास्त्र.

वाहतूक

  • प्र. 26भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्गाचे (National Highway) नाव.
  • प्र. 30भारतातील रस्ते सांख्यिकी अहवालानुसार राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये देशात दुसऱ्या क्रमांकावर असणारे राज्य.

औद्योगिक विकास

  • प्र. 27महाराष्ट्रातील औद्योगिक विभाग आणि प्रमुख औद्योगिक क्षेत्रे (विंचूर, हुपरी, बुटीबोरी, शेंद्रा).
  • प्र. 28औरंगाबाद औद्योगिक शहराची (AURIC - Aurangabad Industrial City) मुख्य वैशिष्ट्ये व दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्ट्यातील स्थान.

लोकसंख्या

  • प्र. 29१९८१ ते २०११ या कालावधीतील भारतातील लोकसंख्या वाढीचा दर आणि लोकसंख्या संक्रमण अवस्था (Demographic Transition).
  • प्र. 32२०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील नागरीकरणाची टक्केवारी, नागरी लोकसंख्येतील क्रमांक व सर्वात कमी नागरीकरण असलेला जिल्हा.

प्राकृतिक भूगोल

  • प्र. 31भारतातील उच्च भूकंप तीव्रता प्रवण क्षेत्र (High Intensity Earthquake Zone) आणि त्याचा भौगोलिक विस्तार.
  • प्र. 37महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीच्या प्रादेशिक विभागातील 'मध्य कोकण' मध्ये समाविष्ट होणाऱ्या प्रमुख खाड्या.
  • प्र. 38लक्षद्वीप आणि मिनिकॉय बेटे एकमेकांपासून वेगळी करणाऱ्या सागरी चॅनेलचे नाव (Degree Channel).

नदी प्रणाली

  • प्र. 33महाराष्ट्रातील प्रमुख जलसिंचन योजना आणि त्यांचे संबंधित जिल्हे (कण्हेर, मुकणे, विष्णुपुरी, बेंबळा).
  • प्र. 35गोदावरी नदीच्या प्रमुख उपनद्यांचा (प्रवरा, मांजरा, वर्धा, प्राणहिता) त्यांच्या लांबीनुसार चढता क्रम.

खनिज संपत्ती व मृदा

  • प्र. 34भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादनात आघाडीवर असणारे प्रमुख राज्य.
  • प्र. 36मृदा निर्मितीच्या आधारे महाराष्ट्रातील जमिनीचे शास्त्रीय वर्गीकरण सर्वप्रथम १९३८ मध्ये करणारे शास्त्रज्ञ.

हवामानशास्त्र

  • प्र. 39जी.टी. त्रिवार्था (G.T. Trewartha) यांच्या जागतिक हवामान वर्गीकरणानुसार भारताच्या पश्चिम किनारपट्टी आणि त्रिपुरा राज्यातील हवामानाचा प्रकार.
  • प्र. 40महाराष्ट्राला नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून (South-West Monsoon) मिळणाऱ्या पावसाची एकूण टक्केवारी.
4. अर्थव्यवस्था (Economics)15 प्रश्न · प्र. 41 ते 55

अभ्यासक्रम घटक: भारतीय अर्थव्यवस्था (राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य) व शासकीय अर्थव्यवस्था (अर्थसंकल्प, कर रचना, राजकोषीय नीति).

बँकिंग व वित्तीय क्षेत्र

  • प्र. 41१९९५ मध्ये बँक ग्राहकांच्या तक्रारींचे व वादांचे जलद व स्वस्त निवारण करण्यासाठी सुरू करण्यात आलेली 'बँकिंग लोकपाल योजना' (Banking Ombudsman Scheme).
  • प्र. 47भारतीय व्यापारी बँकिंग प्रणालीमध्ये जलद वाढ आणि नफा मिळवून देणारा प्रमुख व्यवसाय घटक (Retail Banking).

राष्ट्रीय उत्पन्न व आर्थिक पाहणी

  • प्र. 42स्वांतत्र्यानंतर ऑगस्ट १९४८ मध्ये स्थापन झालेली 'राष्ट्रीय उत्पन्न समिती' (National Income Committee), तिचे सदस्य व अहवाल सादरीकरण वर्षे.
  • प्र. 52केंद्रीय मुख्य आर्थिक सल्लागारांच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार (Economic Survey) भारतीय अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनाचा (Economic Recovery) आकृतीबंध.

कृषी वित्त व शेती क्षेत्र

  • प्र. 43ग्रामीण भागातील शेती आणि ग्रामीण उपक्रमांना पुनर्वित्त व कर्जपुरवठा करणारी भारतातील शिखर संस्था (NABARD).
  • प्र. 48भारतीय शेती क्षेत्रातील उत्पादकता वाढीवर प्रभाव पाडणारे मुख्य दोन घटक (तांत्रिक व संस्थात्मक घटक).

सार्वजनिक वित्त, अर्थसंकल्प व कर रचना

  • प्र. 44केंद्रीय अर्थसंकल्प २०२१-२२ मधील केंद्र सरकारच्या प्राप्तीचा व उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत.
  • प्र. 49वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा, २००३ (FRBM Act 2003) ची मुख्य राजकोषीय उद्दिष्टे.
  • प्र. 53केंद्रीय अर्थसंकल्प २०२० नुसार वैयक्तिक आयकराच्या (Income Tax) विविध टप्प्यांसाठी निश्चित करण्यात आलेली करपात्र मर्यादा.
  • प्र. 54भारतातील कौटुंबिक व औद्योगिक वीज दरांची जागतिक तुलना आणि वितरण खर्चाच्या वसुलीचे स्वरूप.

लोकसंख्याशास्त्र व सामाजिक विकास

  • प्र. 45२०११ च्या राष्ट्रीय जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची एकूण घनता (Density of Population).
  • प्र. 46भारतातील लोकसंख्येची गुणात्मक वैशिष्ट्ये, दरडोई उत्पन्न, राहणीमान व शहरीकरणाचा दारिद्र्यरेषेवरील प्रभाव.
  • प्र. 51बालमृत्यूदराची (Infant Mortality Rate - IMR) व्याख्या आणि एका वर्षात १००० जिवंत जन्मांमागे होणाऱ्या बालमृत्यूंची संख्या.

उद्योग, SEZ व परकीय व्यापार

  • प्र. 50भारतातील विशेष आर्थिक क्षेत्रांच्या (SEZ - Special Economic Zones) स्थापनेची मुख्य उद्दिष्टे व अपवाद.
  • प्र. 55आंतरराष्ट्रीय व्यापारातील वस्तूंच्या किंमतीतील फरक, व्यापाराच्या अटी (Terms of Trade) आणि व्यवहारशेषाची (Balance of Payments) नोंदणी पद्धत.
5. सामान्य विज्ञान (General Science)15 प्रश्न · प्र. 56 ते 70

अभ्यासक्रम घटक: भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), प्राणीशास्त्र (Zoology), वनस्पतीशास्त्र (Botany) व आरोग्यशास्त्र (Hygiene).

भौतिकशास्त्र (Physics)

  • प्र. 56०.०२५ इलेक्ट्रॉन व्होल्ट (eV) ऊर्जा असणाऱ्या न्यूट्रॉनचा प्रकार (Thermal Neutron).
  • प्र. 57उष्मागतिकीच्या नियमांनुसार (Thermodynamics) कमी तापमानाच्या वस्तूकडून उच्च तापमानाच्या वस्तूकडे उष्णतेचे स्थानांतरण करण्याबाबतच्या अटी.
  • प्र. 58मानवी कानाला ऐकू येणाऱ्या ध्वनीच्या वारंवारतेची किमान मर्यादा (Lower Pitch Limit / Audibility Threshold).

रसायनशास्त्र (Chemistry)

  • प्र. 59हिऱ्याची (Diamond) अंतर्गत स्फटिक रचना आणि त्याच्या बंधाचा प्रकार (Covalent Crystal).
  • प्र. 60उच्च सामर्थ्य आणि कमी वजनाचे गुणोत्तर असणाऱ्या धातूच्या मिश्रणाचा (Alloy) विमान व ऑटोमोबाईल उद्योगात होणारा वापर.
  • प्र. 61वातावरणामध्ये हायड्रोकार्बन आणि नायट्रोजन ऑक्साईड यांच्यातील प्रकाश-रासायनिक अभिक्रियेतून तयार होणारे दुय्यम प्रदूषक (Secondary Pollutants).

प्राणीशास्त्र व वर्गीकरण (Zoology)

  • प्र. 62अमिबा (Amoeba) या एकपेशीय प्राण्याची लक्षणे, छद्मपादाचा (Pseudopodia) वापर आणि प्राणीवर्गात स्थान.
  • प्र. 63भारतातील प्रमुख वन्यप्राणी आणि त्यांची अचूक वैज्ञानिक नावे (Scientific Names - आशियाई सिंह, पट्टेरी वाघ, भारतीय गेंडा, थामिन हरिण).
  • प्र. 64प्राण्यांच्या उत्क्रांतीच्या इतिहासात सर्वप्रथम जमिनीवरील जीवनाचा अवलंब करणारा प्राणी समूह (Amphibians).

वनस्पतीशास्त्र (Botany)

  • प्र. 65वनस्पतींच्या नैसर्गिक वर्गीकरण पद्धतीचा (Natural Classification System) शोध लावणारे वनस्पतीशास्त्रज्ञ.
  • प्र. 66गव्हावरील तांबेरा रोगासाठी (Wheat Rust Disease) कारणीभूत असणारा सूक्ष्मजीव/कवक (Puccinia graminis tritici).
  • प्र. 67शेती क्षेत्रात भूगर्भातील पाण्याचा उपसा करण्यासाठी वापरले जाणारे पारंपारिक स्रोत.

मानवी शरीरशास्त्र व आरोग्यशास्त्र (Hygiene & Health)

  • प्र. 68मानवी शरीरातील चांगल्या कोलेस्टेरॉलचे (Good Cholesterol) नाव (HDL Cholesterol).
  • प्र. 69मूत्रपिंडातील (Kidney) ट्यूब्यूलर पुनर्शोषण अयशस्वी झाल्यामुळे होणारा चयापचयाचा विकार (Diabetes insipidus).
  • प्र. 70लहान बालकांना तोंडावाटे (Oral Route) दिली जाणारी लस (Sabin Polio Vaccine).
6. अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी (Aptitude & Reasoning)15 प्रश्न · प्र. 71 ते 85

अभ्यासक्रम घटक: अंकगणित (मूलभूत क्रिया, टक्केवारी, व्याज, वेळ-वेग-काम) व बुद्धिमत्ता चाचणी (तार्किक क्षमता, तर्कसंगती, दिशा, घड्याळ).

अंकगणित (Quantitative Aptitude)

  • प्र. 71मंदिराच्या पायऱ्यांवर विशिष्ट नियमाने ठेवलेली फुले आणि एकूण फुलांच्या संख्येचे कोडे.
  • प्र. 75एका प्रतलातील ८ बिंदूंमधून (ज्यातील ३ बिंदू एकरेषीय नाहीत) काढता येणाऱ्या एकूण रेषांची संख्या (Combinations - 8C_2).
  • प्र. 81निरजच्या ६० किमी प्रवासातील वेगवेगळ्या टप्प्यांतील वेगावरून एकूण प्रवासाचा सरासरी वेग (Average Speed) काढणे.
  • प्र. 82नेहा आणि रेखा यांच्या स्वतंत्र कामाच्या दिवसांवरून दोघांनी एकत्र काम केल्यास लागणारे दिवस (Time & Work).
  • प्र. 83दोन वर्षांच्या सरळव्याज व चक्रवाढ व्याजातील फरकावरून व्याजाचा वार्षिक दर (r%) शोधणे.
  • प्र. 84दिलेल्या अपूर्णांकांची (Fractions) मूल्ये तपासून त्यांचा उतरता क्रम निश्चित करणे.
  • प्र. 85प्रवेश शुल्कात घट आणि पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे उत्पन्नावर होणारा निव्वळ टक्केवारी बदल (Percentage Change).

बुद्धिमत्ता चाचणी (Logical Reasoning)

  • प्र. 72श्रीकांतच्या उत्तर दिशेकडील मुखावरून उजवीकडे, डावीकडे व पुन्हा उजवीकडे वळल्यानंतरची अंतिम दिशा (Direction Test).
  • प्र. 73पाच विधानांवरून योग्य तार्किक निष्कर्ष (Syllogism) दर्शवणारा ३ विधानांचा संच निवडणे.
  • प्र. 74वर्ग समीकरणातील गणितात आणि इंग्रजीत उत्तीर्ण/अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांवरून दोन्ही विषयात उत्तीर्ण विद्यार्थी संख्या काढणे (Venn Diagrams / Sets).
  • प्र. 76निरजचे जलद चालणारे घड्याळ आणि पियुषचे मागे पडणारे घड्याळ यांच्या वेळेतील एकूण फरकाचे गणन (Clock Test).
  • प्र. 77शिक्षक, लेखक आणि विवाहित व्यक्ती या तीन घटकांमधील परस्परसंबंध दर्शवणारी योग्य वेन आकृती (Venn Diagram).
  • प्र. 78इंग्रजी मुळाक्षरांचे अंक मालिकेतील स्थान वापरून 'GODFATHER' या शब्दाचा योग्य सांकेतिक कोड (Coding-Decoding).
  • प्र. 79दिलेल्या दोन घटनांमधील 'कारण आणि परिणाम' (Cause and Effect) यांचा परस्परसंबंध ओळखणे.
  • प्र. 80संख्या मालिकेतील वर्ग संख्या व घन संख्यांच्या नियमाच्या आधारे विसंगत घटक (Odd One Out) शोधणे.
7. चालू घडामोडी (Current Affairs)15 प्रश्न · प्र. 86 ते 100

अभ्यासक्रम घटक: जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील महत्त्वाच्या समकालीन घडामोडी.

राष्ट्रीय अहवाल व गुन्हे सांख्यिकी

  • प्र. 86राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (NCRB) अहवालानुसार बालकांवरील गुन्हे व महाराष्ट्रातील परिस्थितीबाबतची विधाने.

शासकीय संस्था व आरोग्य मोहिमा

  • प्र. 87एड्स नियंत्रण संस्था (NACO) आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयात विलीन होण्याबाबतची रचना.
  • प्र. 96'प्रधानमंत्री आवास योजना (नागरी)' (PMAY-U) अंतर्गत देशभरात मंजूर करण्यात आलेल्या एकूण घरांची आकडेवारी.

महाराष्ट्रातील विशेष उपक्रम व पर्यटन

  • प्र. 88ऐतिहासिक शाळा, महाविद्यालयांच्या भेटीसाठी 'कारागृह पर्यटन' (Jail Tourism) उपक्रम राबवणारे महाराष्ट्राचे पहिले राज्य म्हणून स्थान.
  • प्र. 100९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या जीवनप्रवासातील घटनांचा कालानुक्रम.

विज्ञान, अंतराळ व तंत्रज्ञान घडामोडी

  • प्र. 90इस्रोच्या (ISRO) 'जीसॅट-३०' (GSAT-30) उच्च क्षमतेच्या दूरसंचार उपग्रहाची वैशिष्ट्ये व ट्रान्सपॉन्डर.
  • प्र. 98'एक्स-५७ मॅक्सवेल' (X-57 Maxwell) या जगातील पहिल्या पूर्णतः इलेक्ट्रिक प्रायोगिक विमानाची निर्मिती करणारी अंतराळ संस्था (NASA).
  • प्र. 99इस्रोच्या PSLV-C48 प्रक्षेपकाद्वारे अवकाशात सोडण्यात आलेला 'RISAT-2BR1' कृत्रिम उपग्रह.

पुरस्कार, साहित्य व व्यक्तीविशेष

  • प्र. 89NIRI द्वारे सन्मानित विचारवंत दिनबंधू साहू यांचे समुद्री शेवाल व पर्यावरण विषयातील कार्य.
  • प्र. 91सोनाली नवांगुळ लिखित 'मध्यरात्रीनंतरचे तास' या कादंबरीस मिळालेला २०२१ चा मराठी 'साहित्य अकादमी पुरस्कार'.
  • प्र. 92अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेते (२०१९) अभिजित बॅनर्जी यांच्या शैक्षणिक व सामाजिक जीवनप्रवासातील टप्पे.
  • प्र. 94७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला शांतताकाळातील सर्वोच्च 'अशोक चक्र' पुरस्काराने सन्मानित व्यक्ती.
  • प्र. 97भारतीय हवाई दलातील लढाऊ विमानाच्या पहिल्या महिला वैमानिक (अवनी चतुर्वेदी, भावना कांत, मोहना सिंग) बनण्याचा वर्षपट.

क्रीडा पुरस्कार

  • प्र. 93२०२१ मध्ये प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांना सातव्यांदा मिळालेला आंतरराष्ट्रीय 'बॅलेन डी'ओर' (Ballon d'Or) पुरस्कार.

कृषी

  • प्र. 95भारतातील पहिले प्रमाणित सेंद्रिय फळ 'किवी' आणि अरुणाचल प्रदेश राज्याला मिळालेला सेंद्रिय दर्जा.

05 पूर्व परीक्षेचा कट ऑफ

MPSC Group B Prelims 2021 Cut Off

कट ऑफची स्वतंत्र माहिती / PDF उपलब्ध झाल्यावर या विभागात लिंक जोडता येईल.

06 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

1. MPSC Group B Prelims 2021 परीक्षा कधी आयोजित करण्यात आली होती?
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ही 26 फेब्रुवारी 2022 रोजी आयोजित करण्यात आली होती.
2. MPSC Group B Prelims 2021 ची जाहिरात क्रमांक कोणता होता?
या परीक्षेचा जाहिरात क्रमांक 249/2021 होता.
3. MPSC Group B Prelims 2021 मध्ये किती प्रश्न आणि गुण होते?
पूर्व परीक्षेत एकूण 100 प्रश्न विचारले गेले होते आणि परीक्षेचे एकूण गुण 100 होते.
4. MPSC Group B Prelims 2021 परीक्षेचा कालावधी किती होता?
परीक्षेसाठी 60 मिनिटे (1 तास) वेळ देण्यात आला होता.
5. MPSC Group B Prelims 2021 Question Paper आणि Answer Key PDF कुठे मिळेल?
या पोस्टमधील 02. प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका विभागातील VIEW PDF बटणावर क्लिक करून PDF पाहता येईल. DOWNLOAD PDF बटणाद्वारे PDF डाउनलोड करता येईल.

MPSC Group B संयुक्त पूर्व परीक्षेच्या इतर वर्षांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका येथे पाहा.

www.mpscpaper.in
MPSC Previous Year Question Papers · अभ्यासासाठी उपयुक्त साहित्य